Prisoners get luxurious facilities in these jails even 5 star hotels fail in front of them
'या' कारागृहांमध्ये कैद्यांना मिळतात आलिशान सुविधा; पंचतारांकित हॉटेल्सही ठरतील फेल! By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 8:22 PM1 / 6कारागृहाचे नाव ऐकताच काळ्या पट्ट्या, अंधाऱ्या खोल्या, खराब जेवण अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतील. पण आज आम्ही तुम्हाला त्या कारागृहाबद्दल सांगणार आहोत, जिथे कैद्यांना आलिशान सुविधा मिळतात. हे असे कारागृह आहेत, ज्यांच्या समोर 5 स्टार हॉटेल्सही अपयशी ठरतील.2 / 6जर्मनीतील जेवीए फुइसबटेल या कारागृहात राहणाऱ्या कैद्यांना पलंग, बेड, पर्सनल बाथरून, पर्सनल टॉयलेट अशा सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना लॉन्ड्री मशीन, कॉन्फरन्स रूम अशा सुविधाही पुरविल्या जातात.3 / 6जस्टिस सेंटर लियोबेन हे कारागृह लिओबेन या ऑस्ट्रियाच्या पर्वतीय भागात आहे. येथे कैद्यांना सर्व सुविधा मिळतात, त्या लक्झरी 5 स्टार हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. कैद्यांना येथे जिम, स्पा सारख्या आलिशान सुविधा मिळतात. याशिवाय, कैदी येथे इनडोअर गेम्सही खेळू शकतात. कैद्यांना येथे पर्सनल बाथरूम, लिव्हिंग रूम आणि किचन देखील मिळते.4 / 6स्कॉटलंडमधील एचएमपी कारागृहात राहणाऱ्या कैद्यांना चांगला माणूस बनण्यासाठी सर्व सुविधा दिल्या जातात. कैद्यांना 40 आठवडे उत्पादक कौशल्यांचे प्रशिक्षण देखील दिले जाते, जेणेकरून ते चांगले काम करण्यासाठी आणि आरामदायी जीवन जगू शकतील.5 / 6स्वित्झर्लंडमधील चॅम्प्स-डॉलॉन कारागृह हे एकेकाळी मोठ्या संख्येने कैद्यांसाठी कुप्रसिद्ध होते. मात्र, आज येथे राहणाऱ्या कैद्यांना कोणत्याही चांगल्या वसतिगृहाप्रमाणे खोल्या मिळतात. याशिवाय कैद्यांना झोपण्यासाठी पॅड केलेले बेड दिले जातात.6 / 6न्यूझीलंडमध्ये असलेल्या या तुरुंगात कैद्यांना सर्व सुविधा मिळतात. या कारागृहात कैद्यांना शेती, लाईट इंजिनीअरिंग, स्वयंपाक यांसारख्या कामात पारंगत करण्यासाठी वर्गही चालवले जातात. या कारागृहात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications