चलाओ ना नैनो से तीर रे... By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 6:08 PM
1 / 5 सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत असलेली प्रिया वॉरियर नुकतीच कोचीत झालेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने पुन्हा एकदा आपल्या नयनबाणांनी सगळ्यांना घायाळ केले. 2 / 5 रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या प्रियाला सोशल मीडियावरील तरूणाईने 'नॅशनल क्रश'चा किताब बहाल केला आहे. 3 / 5 दोन दिवसांपूर्वी प्रिया प्रकाश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली. तिच्या व्हिडीओने तिला कमालीची लोकप्रियता मिळवून दिली. मल्याळम सिनेमा 'ओरू अडार लव'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रियाच्या सिनेमातील गाण्याच्या एका छोट्याशा क्लिपमुळे ती रातोरात स्टार झाली. 4 / 5 प्रिया प्रकाश स्टारर 'ओरू अडार लव' हा सिनेमा 3 मार्च रोजी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमातील 'मानिका मलयारा पूवी' हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. गाणं प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच गाण्यातील एक लहान क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 5 / 5 त्यामध्ये प्रिया तिच्या भुवया उडवताना दिसते आहे. तिची ही अदाकारी सोशल मीडियावर तरूणांच्या चांगल्याच पसंतीस उतरली. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फॉलोवर्सच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. आणखी वाचा