शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भन्नाट ऑफर! फक्त १००० खर्च करा अन् ३० कोटींचा बंगला मोफत मिळवा; वाचा काय आहेत सुविधा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 8:17 AM

1 / 10
एका चांगल्या घराचं स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्य माणसाला त्याचं संपूर्ण आयुष्य खर्ची करावं लागतं. मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही घर घेत असाल तर त्याची किंमत लाखो-करोडोंच्या दरात असते.
2 / 10
आता आम्ही हे तुम्हाला यासाठी सांगत आहोत कारण एक आलिशान बंगला ज्याची किंमत ३० कोटींहून अधिक आहे. ते तुमचं होऊ शकतं. तेदेखील मोफत. विश्वास बसत नाहीये ना? परंतु हे शक्य आहे. इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्ट येथे असलेला हा बंगला त्याच्या नवीन मालकाच्या शोधात आहे.
3 / 10
आता हा ३० कोटींहून जास्त किंमतीचा असलेला बंगला मिळवण्यासाठी तुम्हालाही काही पैसे खर्च करावे लागतील. परंतु त्याआधी या घरात कोणत्या सुविधा आहेत हे जाणून घ्या. इंग्लंडच्या लेक डिस्ट्रिक्टमध्ये हे घर आहे. या घरातून तुम्हाला प्रसिद्ध विंडरमेयरचा नजारा पाहायला मिळेल. तलावाच्या किनारी असलेल्या या घरात मनोरंजन आणि आरामाची सर्व साधनं मिळतील.
4 / 10
लेक डिस्ट्रिक्टमध्ये असलेल्या या घरामध्ये झोपण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी अशा अनेक लक्झरी सुविधा आहेत. या घराची किंमत ३ मिलियन पौंड आहे. रुपयात बोलायचे झाले तर या घराची किंमत ३० कोटी १५ लाख ९३ हजार २३८ रुपये आहे.
5 / 10
या आलिशान घरात मनमोहक तलाव, निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी मोठं छप्पर, आरामदायी लॉग फायर, सिनेमा हॉल, स्टीम रूम, अत्याधुनिक जिम, बाग आणि वर्कशॉप असलेली मोठी टेरेस आहे. हे घर विंडरमेयर स्टेशनपासून फक्त एक मैल अंतरावर आहे.
6 / 10
आता आम्ही तुम्हाला हे आलिशान आणि मौल्यवान घर कसे मिळवायचे ते सांगू. यासाठी तुम्हाला ऑनलाइन बक्षीस सोडतीत सहभागी व्हावं लागेल. जर तुमचे नशीब चमकले आणि तुम्ही ड्रॉचे भाग्यवान विजेते असाल तर हे घर तुमचे असेल.
7 / 10
या ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त १० पौंड खर्च करावे लागतील. १० पौंड म्हणजेच १००५ रुपये. हे भव्य बक्षीस ओमेझ मिलियन पाउंड हाउस ड्रॉद्वारे आयोजित केलेल्या सातव्या ड्रॉचा भाग आहे.विजेत्याला घरासाठी कोणत्याही शुल्कावर पैसे खर्च करावे लागणार नाहीत कारण सर्व मुद्रांक शुल्क आणि कायदेशीर शुल्क समाविष्ट आहेत.
8 / 10
यासोबतच तुम्हाला घरासह २०००० पौंडचे रोख बक्षीसही दिले जाईल. जर तुम्हाला या घरात राहायचे नसेल तर तुम्ही ते भाड्यानेही देऊ शकता. प्रॉपर्टी एजंट्सच्या मते, हे घर भाड्याने देऊन तुम्ही आठवड्याला ६००० ते ८००० पौंड कमवू शकता. त्याचवेळी, सीझनमध्ये हे घर तुम्ही १२००० पौंडांपर्यंत भाड्याने देऊ शकता.
9 / 10
जर तुम्ही या लकी ड्रॉमध्ये भाग घेतल्यास अल्झायमर रिसर्च यूकेसाठी फंड जमा करण्यातही तुमचं योगदान असेल. Omez ने ५००००० पौंड ध्येय ठेवून कमीत कमी १ लाख पौंड दान करण्याचा विचार केला आहे. ओमेजचे आंतरराष्ट्रीय व्हीपी म्हणाले की, या प्रशंसनीय कार्यात अल्झायमर रिसर्च यूकेसाठी जागरूकता आणि निधी उभारण्यात मदत केल्याबद्दल तुमचे आभारी राहू
10 / 10
ओमाझ मिलियन पौंड हाऊस ड्रॉ लेक डिस्ट्रिक्टच्या ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही www.omaze.co.uk ला भेट देऊ शकता आणि यात ऑनलाइन सहभागी होण्याची अंतिम तारीख २७ मार्च २०२२ आहे आणि पोस्टद्वारे सहभागी होण्याची अंतिम तारीख २९ मार्च २०२२ आहे.