२३ बेडरूम, १९ बाथरूम, २२ एकराची बाग...राणी व्हिक्टोरीयाचा आलिशान बंगला विक्रीला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:54 IST
1 / 7Queen Victoria’s favorite Tuscan villa for sale: ब्रिटनची दिवंगत महाराणी व्हिक्टोरीया यांच्या सगळ्यात आवडत्या ठिकाणांपैकी एक Tuscan villa विक्रीला आहे. त्यामुळे सध्या हा आलिशान बंगला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराणी व्हिक्टोरीया या बंगल्यात सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जात होती. 2 / 7अनेक पुस्तकांमध्ये या बंगल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ब्रिटिश इतिहासात या बंगल्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आता हा ऐतिहासिक बंगला ५५ मिलियनपेक्षा अधिक किंमतीत विकला जात आहे. 3 / 7फ्लोरेंसच्या बाहेरच्या भागातील डोंगरांमध्ये हा बंगला ४००० वर्ग मीटर परीसरात पसरला आहे. तर या बंगल्याचा बगीचा २२ एकर परीसरात आहे. या शहरातील हा दुसरा सगळ्यात मोठा बगीचा आहे. 4 / 7या बंगलाच्या मैदानात टेनिस कोर्ट, हिरवीगार झाडे आणि एक प्राचीन स्वीमिंग पूलही आहे. इतकंच नाही तर इथे एक हेलिपॅडही आहे. तसेच या बंगल्यामध्ये २३ रूम आणि १९ बाथरूम आहेत. सगळ्यांचं इंटेरिअर वेगळं आहे. 5 / 7हा बंगला १४व्या शतकातील आहे आणि आधी हा बंगला फिनी परीवाराकडे होता. त्यांनी हा बंगला १४५४ मध्ये घेतला होता. साधारण ३०० वर्षानंतर म्हणजे १७६० मध्ये हा बंगला इंग्रजांकडे आला. अर्ल कूउपरने हा खरेदी केला होता. पुढे जाऊन हा बंगला हक अर्ल ऑफ क्रॉफर्ड आणि बाल्करेस यांच्याकडे आला.6 / 7त्यादरम्यान पहिल्यांदा महाराणी व्हिक्टोरीया इथे आल्या होत्या. त्या इथे अनेक महिने राहत होत्या. त्यांच्या अनेक आठवणी अजूनही इथे आहेत. 7 / 7त्यावेळी महाराणी व्हिक्टोरीया यांनी या बंगल्यात सगळ्या सोयी-सुविधा करून घेतल्या होत्या. त्यांचा बेड लावण्याची परवानगी मोजक्याच लोकांना होती. त्यांचा एक बेड, दोन खुर्च्या, सोफा, एक रायटिंग टेबल आणि एक बाथरूम नेहमीच रेडी मोडमध्ये राहत होतं. इथे त्यांच्या स्वर्गीय पतीचा एक फोटोही होता.