शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 2:40 PM

1 / 7
स्वच्छ आणि सुंदर कपडे सर्वांनाच आवडतात. मात्र अनेकदा काही कारणांमुळे कपड्यांवर डाग लागतात. कपड्यांवर पडलेले डाग घरगुती उपाय करून कसे काढायचे हे जाणून घेऊया.
2 / 7
चहा आणि कॉफीचे डाग हे हमखास कपड्यांवर पडत असतात. डाग पडल्यावर लगेचच कपडा पाण्याने धुतल्यास तो डाग नाहीसा होतो. तसेच मीठ चोळून धुतल्यासही डाग निघून जातो.
3 / 7
खिशामध्ये चुकून पेनाचं टोपण उघडं राहीलं तर शाईचा डाग लागतो. अशा वेळी लिंबू आणि मीठाचा वापर करा. शाईचा डाग आहे तिथे लिंबू आणि मीठ चोळून थोडावेळ ठेवा. कपडे धुतल्यावर डाग निघून जाईल.
4 / 7
लहान मुलांच्या कपड्यांना नेहमीच चॉकलेट आणि आईस्क्रिमचे डाग लागतात. हे डाग काढणं इतर डागांच्या तुलनेत सोपं असतं. पाण्याच्या मदतीने हे डाग काढता येतात.
5 / 7
रस्त्यावरून येता-जाता अनेकदा कपड्यांना चिखलाचे डाग हे लागत असतात. व्हिनेगरचा वापर करून हे डाग काढता येतात. त्यासाठी कपडे धूताना पाण्यात व्हिनेगर टाका.
6 / 7
काही कारणांमुळे कपड्यांना रंगांचे डाग लागतात. अशा वेळी कपड्याला लागलेला डाग काढ्ण्याच्या नादात कपडे घासले जातात. मात्र यामुळे कपड्याचा रंग फिका पडतो. रंगांचे डाग लागल्यास रॉकेल अथवा नेलपेंट रिमूव्हरच्या मदतीने ते काढता येतात.
7 / 7
दुखापत झाल्यास अनेकदा रक्ताचे डाग लागतात. दुधाचा वापर करून हे डाग घालवता येतात. तसेच पाण्यात मीठ घालून देखील ते काढता येतात.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके