quietest places on earth most silent peaceful places on earth
'ही' आहेत जगातील 5 शांत ठिकाणे, जिथे हृदयाचे ठोके देखील ऐकू येतील! By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 2:49 PM1 / 6तुम्ही शाळेत असताना शिक्षकांनी शांतता राखण्यासाठी एक गोष्ट नक्कीच सांगितली असेल, पिन ड्रॉप सायलेन्स... म्हणजे इतकी शांतता ठेवा की सुई जरी पडली तरी त्याचा आवाज ऐकू येईल. मात्र, हे होऊ शकले नाही. वर्गात किंवा आजूबाजूच्या परिसरातून फिरणाऱ्या पंख्याचा नेहमी आवाज येत असे. पण जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे हे शक्य आहे. या ठिकाणी अगदी लहानसा आवाजही गोंगाट सारखा वाटतो, त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके इथे सहज ऐकू येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच ठिकाणांबद्दल जाणून घ्या...2 / 6या यादीत पहिले स्थान आहे, अमेरिकेतील मिनेसोटा येथील ऑरफिल्ड लॅबोरेटरीज (Orfield Laboratories) आहे. शास्त्रज्ञांनी येथे जगातील सर्वात शांत जागा तयार केली आहे. याठिकाणी इतकी शांतता आहे की तुम्ही तुमचे श्वास आणि हृदयाचे ठोके देखील ऐकू शकता. याला जगातील सर्वात शांत खोली असेही म्हणतात. लोकांसाठी येथे वेळ घालवणे खूप कठीण आहे, कारण येथे राहणे निराशाजनक असू शकते.3 / 6इक्वाडोरमध्ये असलेल्या झाबालो नदीचे जंगल (Zabalo River Wilderness Quiet Park) पर्यावरण संरक्षणासाठी तयार केले गेले आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले अनेक प्राणी येथे राहतात. जंगलाच्या आत कोणतेही वाहतूक मार्ग नाहीत, कोणतेही निवासी क्षेत्र किंवा कोणतेही व्यावसायिक क्षेत्र अस्तित्वात नाही.4 / 6दरवर्षी केवळ 3000 प्रवाश्यांना रशियामध्ये असलेल्या क्रोनोत्स्की नेचर रिझर्व्हला भेट देण्याची परवानगी मिळते. हे रिझर्व्ह आवाजाशिवाय आहे. वाऱ्याचा आवाजही येथे स्पष्टपणे ऐकू येतो.5 / 6आइसलँडमध्ये स्थित लॅण्डमननालौगर (Landmannalaugar) ठिकाण आपले सौंदर्य आणि शांततेसाठी ओळखले जाते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर या ठिकाणाचे सौंदर्य प्राप्त झाले.6 / 6कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटात तुम्हाला भीतीदायक शांतता ऐकू येईल. येथे वाळूचे ढिगारे आहेत (केल्सो ड्युन्स) त्यामुळे आवाज दूर जाऊ शकत नाही. अशा स्थितीत ही जागा एकदम शांत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications