शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इथं सरकार फुकटात देतंय जमीन पण, अट मात्र एकच! ती आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 6:54 PM

1 / 10
आपल्या भारत (India) देशात लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मात्र, असे काही देश आहेत, जिथं परिस्थिती खूपचं वेगळीय.
2 / 10
अलीकडच्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या (Australian town Quilpie) क्विल्पी शहरातून एक अनोखं प्रकरण समोर येतंय. येथील लोकसंख्या खूपच कमीय.
3 / 10
आकडेवारीनुसार, क्विल्पी शहराची लोकसंख्या केवळ 800 इतकी आहे.
4 / 10
अशा स्थितीत लोकसंख्या वाढवणं येथील प्रशासनासमोर एक मोठं आव्हान बनलंय.
5 / 10
इथल्या स्थानिक प्राधिकरणानं (Local Authority) लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना मोफत जमीन देण्याचं जाहीर केलंय.
6 / 10
ऑस्ट्रेलियाच्या क्विल्पी शहरात खूप कमी लोक राहतात. अशा स्थितीत येथील स्थानिक प्राधिकरण लोकांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतंय.
7 / 10
एवढंच नाही, तर येथे अनेक कामगारांचीही गरज आहे. स्थानिक प्राधिकरण येथील जमीन फ्री मध्ये देणार आहे. पण, अट अशी आहे की नागरिक ऑस्ट्रेलियाचा असावा.
8 / 10
क्विल्पी सिटी कौन्सिलनं (Quilpie City Council) शहरातील लोकसंख्येचा अभाव दूर करण्यासाठी अशी ऑफर दिलीय.
9 / 10
पश्चिम क्वीन्सलँड राज्याच्या या भागाला लोकसंख्येच्या अभावामुळे पशुपालन आणि मेंढीपालनाशी संबंधित नोकऱ्या भरण्यात अडचणी येत आहेत.
10 / 10
नगरपरिषदेला अजिबात अपेक्षा नव्हती, की शहरातील लोक मोकळ्या जमिनीच्या आमिषानं घरं बांधण्यासाठी येतील. परंतु, दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत, संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि परदेशातील २५० हून अधिक लोकांनी मोकळ्या जमिनीची चौकशी केलीय.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया