शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हे' आहेत जगातील 5 सर्वात लांब रेल्वे मार्ग; एका मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतो जवळपास आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:56 PM

1 / 7
भारतात रेल्वेला लाइफ लाइन म्हटले जाते. कारण प्रवास करण्यासाठी रेल्वे हा सर्वात सोयिस्कर आणि स्वस्त ऑप्शन आहे. भारतात लांब मार्गवर रेल्वे चालवल्या जातात. मात्र, फक्त भारतातच नाही तर जगभरात असे मोठे रेल्वे मार्ग आहेत.
2 / 7
जगात असे अनेक देश आहेत जिथे रेल्वे नेटवर्कचा विस्तार भारतापेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे, सर्वात लांब रेल्वे मार्ग फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहे. यामध्ये रशियापासून चीनपर्यंतचा समावेश आहे.
3 / 7
पहिली ट्रान्स-सायबेरियन रेल्वे आहे. रशियामधील व्लादिवोस्तोक (सुदूर पूर्व रशियामधील) मॉस्कोला जोडते. हा प्रवास 9,259 किलोमीटरचा असून तो पूर्ण करण्यासाठी सुमारे 7 दिवस लागतात.
4 / 7
दुसरा सर्वात लांब रेल्वे मार्ग टोरोंटो आणि व्हँकुव्हर दरम्यान आहे. त्याची लांबी 4,466 किमी आहे. अधिकृतपणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 4 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागतो.
5 / 7
यानंतर शांघाय ते ल्हासा या रेल्वे मार्गाचा क्रमांक लागतो. हा प्रवास 4373 किलोमीटरचा आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ट्रेनला 46 तास 44 मिनिटे म्हणजे सुमारे 2 दिवस लागतात.
6 / 7
सिडनी ते पर्थ हा रेल्वे रुट या लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. इंडियन पॅसिफिक ट्रेनला हा 4352 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात.
7 / 7
डिब्रूगढ ते कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग जगातील 5 व्या क्रमांकाचा सर्वात लांब रेल्वे प्रवास आहे. या दोन शहरांदरम्यान विवेक एक्सप्रेस चालवली जाते. हा प्रवास 4237 किलोमीटरचा आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ट्रेनला 74 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे