शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आरारारा खतरनाक! बाइकवरून तिघे निवांत जात होते, समोर आला बिबट्या; पुढे जे झालं ते फोटोत बघाच....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 12:34 PM

1 / 9
राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान उत्तर भारतातील सर्वात मोठ्या उद्यानांपैकी एक आहे. सफारी करण्यासाठी इथे नेहमीच लोकांची गर्दी असते. अशात येथील एक मनात धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. ही घटना प्रसिद्ध वाइल्डलाइफ फोटोग्राफर श्रीधर शिवारामने आपल्या कॅमेरात कैद केली. यादरम्यान असं काही घडलं ज्याबाबत त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.
2 / 9
फोटोग्राफर श्रीधर शिवाराम आपला गाइड बॉबीसोबत जंगलात फोटो काढण्यासाठी गेले होते. पण यादरम्यान एका बिबट्याचा टक्कर एका बाइकसोबत झाली.
3 / 9
बाइकवरून तीन लोक जात होते. अचानक समोर बिबट्या आल्याने त्यांचा बॅलन्स बिघडला आणि बाइक बिबट्यावरच पडली. यात तिघांनाही फार जास्त इजा झाली नाही. तेच बिबट्या लगेच तेथून पसार झाला.
4 / 9
श्रीधर शिवाराम द्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार, रणथंभोर नॅशनल पार्कमधून जात असलेले लोक सेल्फी घेत होते. या भागात बिबट्या आणि वाघा जास्त असल्याने तिथे असं करणं फार धोकादायक होतं.
5 / 9
फोटोग्राफर श्रीधर असे फोटो क्लिक करू शकले, याची पूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. त्यांनी फारच कमाल फोटो कॅप्चर केले आहेत. सहसा अशा घटना कॅमेरात कैद करणं अवघड असतं.
6 / 9
ही घटना होळीच्या एक दिवसाआधीची आहे. त्या दिवशी या रस्त्यावर लोकांची ये-जा जास्त होती. सुदैवाने या घटनेत कुणाचंही काही नुकसान झालं नाही.
7 / 9
या घटनेनंतर येथील मंदिरात लोकांच्या जाण्यावर बंदी घातली आहे. आता पार्कमध्ये शटल बस उपलब्ध केली जाईल. जेणेकरून अशा घटना होऊ नये..
8 / 9
या घटनेनंतर येथील मंदिरात लोकांच्या जाण्यावर बंदी घातली आहे. आता पार्कमध्ये शटल बस उपलब्ध केली जाईल. जेणेकरून अशा घटना होऊ नये..
9 / 9
या घटनेनंतर येथील मंदिरात लोकांच्या जाण्यावर बंदी घातली आहे. आता पार्कमध्ये शटल बस उपलब्ध केली जाईल. जेणेकरून अशा घटना होऊ नये..
टॅग्स :Rajasthanराजस्थानSocial Mediaसोशल मीडियाleopardबिबट्या