rare 50p error coin sells for 37 thousand on ebay online auction
५१ रुपये किमतीचं नाणं चक्क ३७ हजारांना विकलं गेलं!, असं कसं झालं? जाणून घ्या हटके कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 8:25 PM1 / 7'खोटा सिक्का भी कभी कभी काम आ जाता है', ही म्हण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. असंच काहीसं एका लिलावावेळी घडलं आहे. एका छोट्याशा चुकीमुळे एक नाणं हजारोंच्या किमतीला विकलं गेलं आहे. ५० पेंसचं (भारतीय चलनानुसार जवळपास ५१ रुपये) एक नाणं ऑनलाइन लिलावा प्रक्रियेत तब्बल ३७,०५० रुपयांना विकलं गेलं आहे. 2 / 7२०१२ सालच्या ऑलिम्पिकच्या थीमवर एक खास नाणं तयार केलं गेलं होतं. पण या नाण्यात काहीतरी कमतरता राहिली होती. त्यामुळे ते वापरलं गेलं नाही. मग त्याचा ऑनलाइन पद्धतीनं ईकॉमर्स वेबसाइट ebay साइटवर लिलाव केला गेला. एकूण ८ खरेदीदारांनी ४७ जणांनी बोली लावली. त्यानंतर ३६० पाऊंड म्हणजेच जवळपास ३७ हजार रुपयांना या नाण्याची विक्री केली गेली. 3 / 7या आठवड्याच्या अखेरीस ३६० पाऊंडमध्ये विकलं गेलेलं हे नाणं २०२१२ साली ऑलिम्पिकच्या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलं होतं. यासाठी एकूण २९ डिझाइन तयार करण्यात आल्या होत्या. त्यापैकीच हे एक नाणं होतं. 4 / 7डिझाइनमध्ये एक चूक झाली. पण ते नाणं सर्वात वेगळं ठरलं. त्यामुळे त्याची ई-बेवर विक्री करण्याचा निर्णय घेतला गेला. 5 / 7२०१२ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या या नाण्याच्या डिझाइनमध्ये काही रेषा चुकीच्या पद्धतीनं डिझाइन केल्या गेल्या होत्या. त्यामुळे हे नाणं नाकारण्यात आलं होतं. 6 / 7२०१२ च्या ऑलिम्पिक शैलीतील केवळ ६०० नाणी तयार करण्यात आली होती. त्यातील फक्त एका चुकीमुळे हे नाणं इतरांपेक्षा वेगळं ठरलं आणि नाण्यांचा संग्रह करणाऱ्यांसाठी एक वेगळीच पर्वणी झाली. नाणं विकत घेण्यासाठी अनेकांनी बोली लावली. 7 / 7नाण्याच्या लिलावाची सुरुवात ९९ पेंसपासून सुरुवात झाली होती. त्याची अखेर ३६० पाऊंडवर झाली. म्हणजेच जवळपास ३६० पटीनं अधिक किमतीनं हे नाणं विकलं गेलं. आणखी वाचा Subscribe to Notifications