शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अद्भूत! दुर्मीळ काळा हिरा जगासाठी बनला रहस्य, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:44 PM

1 / 6
Black Diamond : हिऱ्याची आवड सर्वांनाच असते आणि हिरा आपल्या जवळ असावा अशीही अनेकांची इच्छा असते. पण सर्वांसाठी ते शक्य नसतं. बहुमूल्य रत्नाच्या किंमतीचा विचार करणंही सामान्य व्यक्तींना अवघड होतं. आज तर आम्ही तुम्हाला अशा हिऱ्याबाब सांगत आहोत जो फारच किंमती आणि दुर्मीळ आहे.
2 / 6
ज्या हिऱ्याबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत तो सध्या दुबईमध्ये आहे. हा हिऱ्याचा एक तुकडा आहे ज्याची किंमत ५० कोटी रूपयांपेक्षाही जास्त आहे. या हिऱ्याची आणखी एक खासियत म्हणजे या हिऱ्याबाबत सांगितलं जातं की, हा हिरा पृथ्वीवरील नाही तर दुसऱ्या ग्रहावरील आहे. याचा रंग काळा आहे. त्यामुळे या ब्लॅड डायमंड म्हटलं जात आहे.
3 / 6
या हिऱ्याची देखरेख Sotheby नावाची कंपनी करत आहे. Sotheby ही कंपनी महागड्या वस्तूंचा लिलाव करत आली आहे. Sotheby ने गेल्या सोमवारी हा ब्लॅक डायमंड दुबईतील पत्रकारांसमोर सादर केला होता.
4 / 6
या दुर्मीळ हिऱ्याचं नाव The Enigma असं ठेवण्यात आलं आहे. याची खासियत म्हणजे हा हिरा ५५५.५५ कॅरेटचा काळा हिरा आहे. दुबईहून हा हिरा Los Angeles ला नेला जाणार आणि फेब्रुवारी महिन्यात या काळ्या हिऱ्याचा लिलाव लंडनमध्ये केला जाईल.
5 / 6
अशाप्रकारच्या दुर्मीळ ब्लॅक डायमंडला Carbonado असंही म्हणतात. याआधी हा केवळ ब्राझील आणि सेंट्रल आफ्रिकेत सापडला आहे. या हिऱ्यांमध्ये कार्बन आयसोटोप्स आणि हाय हायड्रोजन असतं. ज्यामुळे हे मानलं जातं की, हा हिरा पृथ्वी नाही तर अंतराळाची देण आहे.
6 / 6
Sotheby's ने आशा व्यक्त केली आहे की, या हिऱ्याला ५० लाख पाउंड म्हणजे साधारण ५०.७ कोटी रूपये किंमत मिळेल. Sotheby's हा हिरा खामसाच्या आकाराचा असल्याचं सांगितलं आहे. खामसाला पश्मिच आशियातील देशांमध्ये तळहाताला म्हटलं जातं. खामसा शब्द ताकदही दर्शवतो.
टॅग्स :DubaiदुबईInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स