Rare colour changing scorpionfish found in gulf of munnar api
आश्चर्य! देशात पहिल्यांदाच आढळला रंग बदलणारा विषारी दुर्मीळ मासा, जाणून घ्या याचं वेगळेपण.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 11:43 AM1 / 12सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टि्टयूटच्या वैज्ञानिकांनी एक दुर्मीळ मासा शोधला आहे. आतापर्यंत तुम्ही ऐकलं आणि पाहिलं असेल की, सरडा रंग बदलतो. पण आता रंग बदलणारा मासाही शोधला गेलाय. धक्कादायक बाब म्हणजे हा मासा फार विषारी आहे. 2 / 12पहिल्यांदाच एखाद्या भारतीय जलस्त्रोतात असा मासा शोधला गेलाय. या माशाला Scorpionfish असं नाव देण्यात आलं आहे. हा मासा शिकार करताना आणि स्वत:चा बचाव करताना रंग बदलू शकतो. सोबतच याच्या पाठीच्या कण्यात विष भरलेलं असतं. जर याला काळजीपूर्वक पकडलं नाही तर तो ते विष सोडू शकतो. (फोटोः CMFRI)3 / 12CMFRI मधील वैज्ञानिक डॉ. आर जेयाबास्करन म्हणाल्या की, या माशात आढळणारं विष हे न्यूरोटॉक्सिक असतं. जर हे विष मनुष्याच्या शरीरात शिरलं तर जोरदार वेदना होऊ शकते. आम्हाला हा मासा समुद्री गवताच्या रंगात बदललेली दिसली. मुन्नारच्या खाडीत असा मासा पहिल्यांदाच आढळून आला.4 / 12डॉ. आर जेयाबास्करन म्हणाल्या की, पहिल्यांदा आम्हाला हा मासा गवतात लपलेला दिसला. त्यानंतर तो एका कोरल स्केलेटनप्रमाणे दिसत होता. 5 / 12आधी समजलं नाही की, हा मासा आहे की, फॉसीलाइड् कोरल स्केलेटन. चार सेकंदानंतर माशाने शरीराच रंग बदलून काळा केला. तेव्हा लक्षात आलं की, ही दुर्मीळ स्कॉर्पियनफिश आहे. (फोटोः CMFRI)6 / 12डॉ. जेयबास्करन यांनी सांगितले की, हा मासा रात्री समुद्रात शिकार करतो. समुद्राच्या खोलात आपली शिकार जवळ येण्याची वाट पाहतो. या माशाचा सेंसरी ऑर्गन फार शार्प असतं. जशी शिकार जवळ येते हा मासा विजेच्या वेगाने शिकार खातो.7 / 12हा मासा 10 सेंटीमीटर अंतरावरून छोट्या छोट्या जीवांकडून सोडलेले तरंगही पकडू शकतो. याच्या शेपटीमध्ये जास्तकरून सेंसरी ऑर्गन असतात. सोबतच याच्या शेपटीवर काळे डाग असतात, त्यामुळे काही लोक याला बॅंडटेल स्कॉर्पियनफिश म्हणतात.8 / 12डॉ. आर. जेयाबास्करन यांनी सांगितले की, सध्या आम्ही हा मासा नॅशनल मरीन बायोडायव्हर्सिटी म्युझिअममध्ये पाठवला आहे. जेणेकरून याबाबत आणखी रिसर्च करता यावा. 9 / 12डॉ. आर. जेयाबास्करन यांनी सांगितले की, सध्या आम्ही हा मासा नॅशनल मरीन बायोडायव्हर्सिटी म्युझिअममध्ये पाठवला आहे. जेणेकरून याबाबत आणखी रिसर्च करता यावा. 10 / 12डॉ. आर. जेयाबास्करन यांनी सांगितले की, सध्या आम्ही हा मासा नॅशनल मरीन बायोडायव्हर्सिटी म्युझिअममध्ये पाठवला आहे. जेणेकरून याबाबत आणखी रिसर्च करता यावा. 11 / 12डॉ. आर. जेयाबास्करन यांनी सांगितले की, सध्या आम्ही हा मासा नॅशनल मरीन बायोडायव्हर्सिटी म्युझिअममध्ये पाठवला आहे. जेणेकरून याबाबत आणखी रिसर्च करता यावा. 12 / 12डॉ. आर. जेयाबास्करन यांनी सांगितले की, सध्या आम्ही हा मासा नॅशनल मरीन बायोडायव्हर्सिटी म्युझिअममध्ये पाठवला आहे. जेणेकरून याबाबत आणखी रिसर्च करता यावा. आणखी वाचा Subscribe to Notifications