Ratan Tata Birthday : Most expensive things owned by Ratan Tata
Ratan Tata Birthday : आलिशान आहे रतन टाटा यांचा बंगला, प्रायव्हेट जेट आणि लक्झरी कार्सचेही आहेत मालक By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 1:04 PM1 / 5टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा(Ratan Tata) देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. ते किती श्रीमंत आहेत हेही कुणाला वेगळं सांगायला नको. २८ डिसेंबर २०२१ ला रतन टाटा यांचा वाढदिवस. ते आता ८४ वर्षांचे झालेत. रतन टाटा यांचा साधेपणा आणि विनम्रता ही त्यांची ओळख आहे. रतन टाटा हे देशातील सर्वात मोठ्या दानशूरांपैकी एक आहेत. साधं जीवन जगणाऱ्या रतन टाटा यांना काही गोष्टींची फार आवड आहे. या वस्तूंची किंमत कोट्यावधी रूपये आहे. चला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊन त्यांच्या या महागड्या वस्तूंबाबत...2 / 5रतन टाटा यांचा लक्झरी बंगला मुंबईतील कुलाबा भागात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या आलिशान बंगल्याची आत्ताची किंमत १५० कोटी रूपये आहे. या बंगल्यात अनेक रूम्स, जिम, स्वीमिंग पूल, सन डेक, बार, लॉन्जसहीत अनेक आधुनिक सुविधा आहेत.3 / 5मीडिया रिपोर्ट्सनुसार, रतन टाटा यांच्याकडे डसॉल्ट फाल्कन २००० प्रायव्हेट जेटही आहे. फ्रान्सच्या इंजिनिअरांनी तयार केलेल्या या जेटची किंमत साधारण ३० मिलियन डॉलर म्हणजेच २२४ कोटी रूपये असल्याचं सांगितलं जातं. रतन टाटा हे स्वत: पायलट आहेत आणि अनेकदा ते हे जेट स्वत: उडवतात.4 / 5मासेराती क्वाट्रोपोर्टे कारही रतन टाटा यांच्याकडे आहे. या कारची किंमत साधारण १.७१-२.११ कोटी रूपयांदरम्यान सांगितली जाते. ही कार ४.७ सेकंदात ० ते ६० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावते. ही कार आतून फार लक्झरी आहे. रतन टाटा यांची ही फेवरेट कार आहे.5 / 5मर्सीडीज बेंज एस-क्लास ही कारही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे. या कारची एक्स शोरूम किंमत साधारण १.५७ ते १.६२ कोटी दरम्यान आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications