Real life mowgli ellie found in African jungle loves to eat grass
रिअल लाइफ मोगली! जंगली जनावरांसोबत भावासारखा राहतो हा 'मोगली', डाळ-भात नाही तर गवत खाऊन जगतो! By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 12:27 PM1 / 9तुम्ही मोगलीबाबत तर ऐकलं असेलच. मोगली बालपणापासून जंगलात जनावरांसोबत राहिला होता. जनावरांसोबत तो खेळत होतो, वागतही त्यांच्यासारखाच होता. इतकेच काय तर तो बोलतही त्यांच्यासारखाच होता. आता २०२० मध्ये आणखी एक मोगली समोर आला आहे. २१ वर्षीय एलीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. साउथ आफ्रिकेतील रंवाडामध्ये राहणाऱ्या एलीला मनुष्यांमध्ये राहण्यापेक्षा जंगलातील जनावरांसोबत राहणं अधिक पसंत आहे. तो झाडांवर राहतो आणि केळी-गवत खाऊन जगतो. एलीची आई त्याला स्पेशल चाइल्ड मानते. सोबतच एलीची आई सांगते की, भलेही तिचा मुलगा वेगळा आहे. पण हीच बाब त्याला स्पेशल बनवते.2 / 9आफ्रिकेमध्ये रवांडाच्या एका गावात राहणारा २१ वर्षीय एली बालपणापासूनच इतर मुलांसारखा नव्हता. तो जंगलात पळून जात होता आणि वेगवेगळ्या जनावरांसोबत राहत होता.3 / 9एलीला बोलता येत नाही. सोबतच घरी तयार केलेलं जेवणही खात नाही. त्याला त्याच्या आईच्या हातचं जेवण आवडत नाही. तसेच तो घरातील लोकांशी बोलतही नाही.4 / 9आईच्या हातचं जेवण खाण्याऐवजी तो जंगलातील फळं आणि गवत खाणं पसंत करतो. एलीची आई त्याला देवाचं गिफ्ट मानते.5 / 9एलीआधी त्याच्या आईला पाच बाळ झाले होत. त्यातील कुणीच जन्मानंतर फार काळ जगू शकले नाहीत. बऱ्याच वर्षांनी एलीचा जन्म झाला आणि तोही स्पेशल चाइल्ड निघाला.6 / 9बालपणापासूनच एलीला गोष्टी समजण्याची समस्या होती. यामुळे तो शाळेत जाऊ शकला नाही. सोबतच तो गावातील लोकांपासूनही दूर राहता होता.7 / 9गावातील लोक एलीला माकड म्हणतात. त्याच्या वयाची मुले त्याला टोमणे मारतात. पण एलीची आई त्याचा खूप लाड करते.8 / 9एलीची आई सांगते की, तिचा मुलगा निरागस आहे. त्याला दुनियादारी समजत नाही. तो फार भोळा आहे. एली नेहमीच जंगलात पळून जातो.9 / 9अशात त्याची आई त्याच्यावर नजर ठेवून असते. तो जंगलात हरवू नये म्हणून त्याच्या मागावर असते. जेणेकरून त्याला पकडून घरी परत आणता येईल. गावातील लोक म्हणतात की, एली उसेन बोल्टपेक्षाही वेगाने धावतो. सेकंदात तो जंगलात पळून जातो. अशात त्याच्यावर लक्ष ठेवणं त्याच्या आईसाठी कठिण होत. आणखी वाचा Subscribe to Notifications