Red bull flugtag competition, peoples have fun picture
अशी अतरंगी विमानं पाहून तुम्हालादेखील होईल उडण्याचा मोह By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:22 PM1 / 5खुल्या आकाशात उडणे कोणाला आवडणार नाही? लहानपणी आपण चिमणीला उडताना पाहिल्यानंतर आपल्यालाही आकाशात उडण्याची इच्छा व्हायची. अशा लोकांसाठी Red Bull Flugtag आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये स्पर्धकांनी घरुन अतरंगी आणि मानवनिर्मित हवाई जहाज बनविले जाते. या स्पर्धेचा मुख्य हेतू फक्त मनोरंजन करणे हा आहे. 2 / 5Red Bull Flugtag ही स्पर्धा मूळ दक्षिण इंग्लडमध्ये 1971 साली Birdman Rally च्या नावाने प्रसिद्ध आहे. 3 / 5दुसरी Red Bull Flugtag स्पर्धा 1991 मध्ये ऑस्ट्रियातील विएना येथे आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा दरवर्षी जगभरातील 35 शहरांमध्ये आयोजित केली जाते. 4 / 5क्रॅश होण्याची कोणतीही भीती नसते कारण हे पाण्यामध्ये लॉन्च केलं जातं. नियमानुसार मशीन 10 मीटरपेक्षा अधिक लांब असू नये आणि साधारण 150 किलोग्रॅम वजन असणं गरजेचे आहे. 5 / 5स्पर्धेत तीन महत्वपूर्ण गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विमान किती लांबपर्यंत उडू शकते. विमान बनविण्याचं डिझाईन रचनात्मक आणि कलात्मक असणं गरजेचे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications