शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गर्लफ्रेन्डच्या रूममध्ये बॉयफ्रेन्डला दिसलं असं काही, त्यानेच झाला तिचा भांडाफोड!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 3:06 PM

1 / 11
गर्लफ्रेन्डच्या एका सवयीमुळे तरूण इतका वैतागला की, त्याला रिलेशनशिप एक्सपर्टला मदत मागण्याची गरज पडली. त्याच्यासोबत घडलेला किस्सा सांगत तरूण म्हणाला की, त्याची गर्लफ्रेन्ड नेहमीच पैशांच्या मागे धावते. तर तो एक सामान्य माणूस आहे. गरजा पूर्ण न झाल्यावर आता गर्लफ्रेन्डने त्याला दगा देणंही सुरू केलंय. (प्रातिनिधिक छायाचित्र)
2 / 11
तरूणाने लिहिलं की, 'मी कन्स्ट्रक्शनचं काम करतो. चांगल्या पगारासाठी मी दिवस-रात्र मेहनत करतो. पण माझ्या गर्लफ्रेन्डसाठी हे पुरेसं नाही. मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. पण मला वाटतं की, मी इतके पैसे कधीच जमवू शकणार नाही की, तिला खूश ठेवू शकेल'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
3 / 11
त्याने लिहिले की, 'ती ब्युटिशिअन आहे आणि फार सुंदर आहे. कुणीही तिच्याकडे सहजपणे आकर्षित होईल. आम्ही तीन वर्षांपासून सोबत आहोत. आमच्या नात्याच्या सहा महिन्यांनंतर मला समजलं की, तिचं दुसऱ्यासोबत अफेअर सुरू आहे. ही बाब तिच्या सहकाऱी महिलेने मला सांगितली'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
4 / 11
'जेव्हा मी माझ्या गर्लफ्रेन्डला याबाबत विचारले तर ती म्हणाली की, तिला याची गॅरंटी नव्हती की, आमचं नातं इतके वर्ष चालेल. तर दुसरा तरूण म्हणत होता की, तो नातं निभावेल. त्यावेळी मी तिला समजावून सांगितलं की, मला तिच्यासोबत राहयचं आहे आणि मी तिला माफ केलं'.(प्रातिनिधिक छायाचित्र)
5 / 11
तरूणाने लिहिलं की, 'मी माझ्याकडून तिला नेहमीच बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो. तिला चांगल्या बार आणि रेस्टॉरन्टमध्ये घेऊन जातो. पण मला वाटतं की, हे तिच्यासाठी पुरेसं नाही. काही दिवसांपूर्वी मी तिच्या कपाटामागे खूपसारे डिझायनर बॅग्स, शूज आणि दागिने पाहिले'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
6 / 11
तरूणाने रिलेशनशिप एक्सपर्टला सांगितलं की, 'आम्ही सोबत राहत नाही. पण एकमेकांच्या घरी येत-जात असतो. मी माझं एक जॅकेट तिच्या घरी विसरलो होतो. ते मी तिच्या रूममध्ये शोधत होतो. तेव्हाच माझी नजर कपाटाच्या मागे गेली'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
7 / 11
'कपाटाच्या मागे ठेवलेल्या या सामानात मला एक छोटी पर्स सापडली. त्यात एक नोट लिहिलेली होती. ज्यात लिहिलं होतं की, 'सर्वात हॉट मुलीसाठी हॉट बॅग'. त्यासोबतच त्यावर किसचा इमोजीही होता. (प्रातिनिधिक छायाचित्र)
8 / 11
त्याने पुढे लिहिले की, 'मी ही नोट वाचतच होतो की, तेव्हा माझी गर्लफ्रेन्ड आली आणि तिने मला ती नोट वाचताना पाहिलं. काही मिनिटे शांत राहिल्यानंतर तिने तिच्या तोंडाने सगळं मान्य केलं. माझ्या गर्लफ्रेन्डने जे सांगितलं ते ऐकून मी थक्क झालो'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
9 / 11
माझी गर्लफ्रेन्ड म्हणाली की, सगळंकाही सेक्स असू शकत नाही. कारण ती गोष्ट सहजपणे विसरली जाऊ शकते. महागडे गिफ्ट्स आणि लक्झरी गाड्यांच्या नादात बिघडत गेली'. तरूणाने एक्सपर्टला विचारले की, मी माझ्या गर्लफ्रेन्डसोबत भविष्याचं स्वप्न पाहू शकतो. पण मी तिला माझ्या छोट्या कारमध्येच फिरवू शकतो'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
10 / 11
यावर उत्तर देत रिलेशनशिप एक्सपर्ट म्हणाले की, 'झगमगती आणि पैशांनी भरलेली लाइफस्टाईल कधीच खऱ्या प्रेमाला पर्याय ठरू शकत नाही. जर तुमची गर्लफ्रेन्ड अटींशिवाय तुमच्यावर प्रेम करू शकत नसेल तर तिला कितीही पैसे मिळाले तरी तिला ते कमीच वाटतील'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
11 / 11
एक्सपर्ट म्हणाले की, 'पैशांच्या हव्यासासोबतच असंही होऊ शकतं की ती तुमच्यासोबतच्या नात्यात आनंदी नसेल. तुमच्या गर्लफ्रेन्डला समजवावं लागेल की, सगळं काही एकत्र मिळणार नाही. तुम्ही दोघांनी शांतपणे तुमच्या नात्यावर गंभीरतेने चर्चा केली तर बरं होईल. त्यानंतरही तुमच्या गर्लफ्रेन्डच्या सवयीत बदल होत नसेल तर तुम्ही तुमचं हे नातं संपवण्याचा विचार करायला हवा'. (प्रातिनिधिक छायाचित्र)
टॅग्स :relationshipरिलेशनशिपJara hatkeजरा हटकेRelationship Tipsरिलेशनशिप