शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संशोधकांना नदीत सापडली 1800 वर्षे जुनी चांदीची नाणी, समोर आली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 3:40 PM

1 / 5
बर्लिन : पुरातत्व शास्त्रज्ञांना नदीच्या खोलात नाण्यांचा खजिना सापडला आहे. या खजिन्यात सोन्या-चांदीचे दागिणे नसून नाणी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 1800 वर्षांपूर्वी ही नाणी वेर्टाच नदी किनारी लपवून ठेवल्याचा अंदाज जानकारांचा आहे. जर्मनीतील ऑग्सबर्ग येथे पुरातत्वशास्त्रज्ञांना ही नाणी सापडली आहेत.
2 / 5
नदीच्या खोलात नाण्यांचा ढीग सापडला- लाइव्ह सायन्सच्या वृत्तानुसार, पुरातत्व शास्त्रज्ञांना या वर्षाच्या सुरुवातीला एका प्राचीन नदीच्या खोलात हा नाण्यांचा ढिगारा सापडला होता. नाणी नदीतील एका खड्ड्यात विखुरलेली होती. ऑग्सबर्ग शहराच्या पुरातत्व सेवेचे संचालक सेबॅस्टियन गार्होस यांनी या ढिगाऱ्याचे उत्खनन केले. नाण्यांच्या ढिगाऱ्याजवळ दुसरी कोणतीही कलाकृती सापडली नसल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितले.
3 / 5
तिसऱ्या शतकातील नाणी- जर्मनीतील तुबिंगेन विद्यापीठातील प्राचीन नाणकशास्त्राचे प्राध्यापक स्टीफन क्रॅमनिसेक यांनी सांगितल्यानुसार, ही नाणी 'डेनेरी' आहेत, जी इ.स. 1 ते 3 ऱ्या शतकापर्यंत वापरली जायची. नाण्यांबाबत क्रॅमनिसेक म्हणाले की, वेर्टाच नदीच्या पुरात आलेल्या पुरांमध्ये नाणी लपवण्याची जागा वाहून गेली असावी, ज्यामुळे ही नाणी नदीत विखुरल्या गेली.
4 / 5
ते पुढे म्हणाले की, आम्ही नुकतेच नाण्यांची साफसफाई आणि संशोधन सुरू केले आहे, परंतु आतापर्यंत जे काही समोर आले आहे त्यावरून असे दिसते की या नाण्यातील सर्वात नवीन नाणे तिसऱ्या शतकाच्या सुरूवातीस टाकण्यात आले होते. याचा अर्थ ही नाणी तिसऱ्या शतकातील असावीत. सध्यातरी, आमचा असा अंदाज आहे की ही नाणी 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीला ऑगस्टा विंडेलिकम या रोमन शहराबाहेर पुरली गेली असावीत.
5 / 5
नाणी का पुरली ?- नाण्यांच्या दफनाच्या वेळी रोमन साम्राज्य पूर्ण जोमात होते. त्यांची नाणी साम्राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आणि बाहेरच्या भागातही पोहोचत होती. क्रॅमनिसेक यांनी सांगितले की, त्या वेळी ऑगस्टा विंडेलिकम या रोमन प्रांताची राजधानी रतिया होती. ही नाणी का गाडली गेली, हे माहीत नाही. पण, याचा शोध संशोधकांकडून लावला जातोय.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीयInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स