robot hotel in Vijayawada, Andhra Pradesh, grabbing attention of the people as robots serving food
काय खाणार? रेस्टॉरंटमध्ये रोबो विचारतायत हा प्रश्न, सोशल डिस्टन्सिंगचं पूर्ण पालन... By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 5:19 PM1 / 10जगभरात कोरोनाचं संकट असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यावश्यक आहे. इतर अनेक ठिकाणी ते पाळलं जाईल, मात्र रेस्टॉरंटमध्ये ते कसं पाळायचं, हा प्रश्नच आहे.2 / 10या प्रश्नावर एक जालीम उत्तर सापडलं आहे. आता वेटरचं काम करणार आहेत ते रोबो. 3 / 10आंध्र प्रदेशातील एका रेस्टॉरंटनं हे रोबो आणले आहेत. हे रोबो ग्राहकांकडून ऑर्डर घेण्याचं आणि तयार झालेली ऑर्डर ग्राहकांना देण्याचं काम करतात.4 / 10वेटरच्या रुपात असलेल्या रोबोला ऑर्डर देणं नागरिकांना थोडं विचित्र वाटतंय. 5 / 10पण सोशल डिस्टन्सिंग राखण्याासाठी या पर्यायाला चांगलीच पसंती मिळत आहे.6 / 10या हॉटेलमध्ये सध्या लोकं येत आहेत, ऑर्डर देत आहेत आणि चमचमीत पदार्थांवर तावही मारत आहेत.7 / 10अशा प्रकारची सर्व्हिस ग्राहकांना सुरक्षित वाटत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासन या हॉटेलमधील गर्दी वाढत असल्याचं चित्र आहे.8 / 10रोबो सध्या वेटरचं काम करत असल्याची माहिती हॉटेलचे मॅनेजर नागेश यांनी सांगितलं आहे.9 / 10 हे रोबो पूर्णतः स्वयंचलित असून ऑर्डर स्विकारण्याचं आणि पोहोचवण्याचं काम ते स्वतःच करत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.10 / 10हे रेस्टॉरंट आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications