robot saibira will file a complaint about peoples
पोलीस ठाण्यात रोबोट तैनात! By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 3:49 PM1 / 7विशाखापट्टनम : आंध्र प्रदेश पोलिसांनी नागरिकांच्या मदतीसाठी एक खास रोबोट विकसित केला आहे. 2 / 7येथील विशाखापट्टनम पोलिसांनी सायबर गुन्हा संदर्भातील प्रकरणात लोकांना त्वरित न्याय देण्यासाठी एका कृत्रिम रोबोटची नियुक्ती केली आहे. 3 / 7सायबिरा (CYBIRA) असे या रोबोटचे नाव आहे असून त्याला महारानीपेटा पोलीस ठाण्यात तैनात करण्यात आले आहे.4 / 7सायबिरा रोबोटचे लॉन्चिग पोलीस आयुक्त आर. के. मीणा यांनी गेल्या सोमवारी केले. 5 / 7हा रोबोट विकसित करणारी कंपनी रोबो कॅपलर प्रायव्हेट लिमिटेडचे सदस्य डीके इरावत यांनी सांगितले की, 'रोबोट लोकांच्या तक्रारी नोंद करून घेईल आणि स्वंयचलितरित्या पोलीस विभागाकडे पाठवेल.'6 / 7तसेच, या विभागाकडून या तक्रारींचा निपटारा झाला नाही, तर रोबोट उच्च प्राधिकरण किंवा उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रारी पाठवून देईल, असे डीके इरावत यांनी सांगितले. 7 / 7याशिवाय, अधिकाऱ्यांनी सुद्धा तक्रारींचे निराकरण करण्यास असमर्थता दाखविली तर रोबोट थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे स्वयंचलितरित्या तक्रारी पाठवणार आहे, असेही डीके इरावत यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications