शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हॉटेलमध्ये 'रोबोट' आचारी, स्वयंपाक करी लई भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 3:05 PM

1 / 7
रोबोट प्रत्येक क्षेत्रात काम करताना पाहायला मिळत आहेत. चीनमध्ये एक असं हॉटेल आहे जिथे स्वयंपाक तयार करण्यासाठी, वाढण्यासाठी तसेच रुम सर्विसच्या सर्व सुविधा देण्याचे काम रोबोट करतात. या खास हॉटेलबाबत जाणून घेऊया.
2 / 7
FlyZoo असं या हॉटेलचं नाव असून हे अलीबाबा ग्रुपचं सुंदर हॉटेल आहे. हॉटेलमध्ये सर्व काम आर्टिफिशल इंटेलिजन्स, रोबोट आणि स्वयंचलित मशीन्स करतात.
3 / 7
हॉटेलमध्ये कॅप्सूल आकाराचे रोबोट पाहुण्यांना जेवण वाढण्याचे काम करतात. FlyZoo या हॉटेलमध्ये एक स्पेशल बारही आहे. या बारमध्ये रोबोट 20 प्रकारचे कॉकटेल सर्व्ह करतात.
4 / 7
एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर रुममध्ये प्रवेश करण्यासाठी चावीचा वापर केला जातो. मात्र या हॉटेलमध्ये फेशियल रेकग्निशन सिस्टमद्वारे प्रवेश करावा लागतो.
5 / 7
हॉटेलमधील सर्व रूममध्ये व्हॉइस कमांड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हे व्हॉइस कमांड डिव्हाईस ग्राहकांनी सांगितल्याप्रमाणे लाइट, टीव्ही बंद-सुरू करण्यासोबतच अनेक कामं ऑटोमॅटीक करतात.
6 / 7
FlyZoo या हॉटेलमध्ये ग्राहकांना आपली रूम शोधण्यासाठी जास्त कष्ट घेण्याची गरज नाही कारण रोबोट रूमपर्यंत घेऊन जाण्याचेही कामही करतात.
7 / 7
हॉटेलमधून चेकआउट करण्याची पद्धतही खूपच हायटेक आहे. यासाठी अ‍ॅपवर असलेले एक बटण क्लिक करावे लागते. ज्यानंतर रूम आपोआपच लॉक होते आणि पैसे थेट अलीबाबाच्या ऑनलाईन वॉलेटमध्ये जातात.
टॅग्स :chinaचीनtechnologyतंत्रज्ञानRobotरोबोटhotelहॉटेल