नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
पतीसोबत कंटेनरमध्ये राहते महिला, पैसे वाचवण्याचा अनोखा छंद; महिन्याला किती खर्च करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 19:15 IST
1 / 8बऱ्याचदा आपलं आयुष्य ऐशो-आरामात जगण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. हायप्रोफाईल लाईफ स्टाईल जगणं अनेकांचं स्वप्न असते. परंतु काही लोक आजही जगात असे सापडतील ज्यांच्याकडे चांगली लाईफ स्टाईल असूनही त्यांना गरिबीत जीवन जगायला फार आवडतं. 2 / 8एक महिला तिच्या पतीसोबत अजब लाईफ स्टाईल जगण्यासाठी कंटनेरमध्ये आयुष्य घालवत आहे. त्याशिवाय स्वत:चा खर्च कमी करण्यासाठी बरेच अशी कामे करते जे एखाद्या दुसऱ्या शहरातील जीवन जगणाऱ्यांना विचार करणेही कठीण जाईल.3 / 8स्कॉटिश महिला रॉबिन स्वान यांच्या जीवनशैलीने अनेकांना हैराण केले आहे. ३३ वर्ष स्वानने तिचा खर्च वाचवण्यासाठी अजब गजब उपाय शोधून काढलेत. घराच्या भाड्याचे पैसे वाचवण्यासाठी ती तिच्या पतीसोबत एका शिपिंग कंटेनरमध्ये राहते. २ वर्षापूर्वी तिने आत्मनिर्भर जीवनशैली जगण्यासाठी हा निर्णय घेतला. 4 / 8इतकेच नाही तर ही महिला स्वत: शेती करते. मांसासाठी पशुपालन करते, त्याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी ती पावसाच्या पाण्याचाही वापर करते. २०२३ साली तिने तिचं आलीशान घर सोडले. ज्यात टीव्ही, फ्रिज, कार यासारख्या लग्झरी वस्तू होत्या. 5 / 8तिने सर्व काही विकून स्टर्लिंगजवळच ७ एकर जमीन खरेदी केली, ज्याची किंमत २ कोटी ९ लाख इतकी होती. त्यानंतर तिने ४ लाख ७० हजार रुपयांत ४० बाय ८ फूटाचा शिपिंग कंटेनर खरेदी केला. ज्यात ती तिचा २९ वर्षीय पती ल्यूकसोबत राहते. गरजेनुसार तिने कंटेनरमध्ये राहण्याची तयारीही केली.6 / 8हळूहळू आवश्यक गोष्टींची जुळवाजुळव करून तिने तिच्या स्वप्नातील लाईफस्टाईलमध्ये राहणे सुरू केले. दोघांनी कंटेनरमध्ये घरातील आवश्यक गोष्टी बनवल्या. सौर पॅनेल लावून घरातील वीजेचा खर्च कमी केला. पावसाच्या पाण्याचा वापर केला. त्यासाठी हार्वेस्टिंग आणि फिल्टरिंग सिस्टम बनवून घेतली.7 / 8पॉलिथीन टनलमध्ये भाजीपाला लागवड केली. अंड्यांसाठी कोंबड्या आणि मांससाठी ससे, डुक्करही पाळले. त्यानंतर काही दिवसांनी तिने अंडी, मांस बाजारात विकण्यास सुरूवात केली. परंतु याचा अर्थ त्यांचा खर्च नाही असं नाही.8 / 8स्वान आणि ल्यूक यांच्याकडे फोन बिल, पाणी, जेवण हे सगळे मिळून महिन्याला २९ हजार रूपये खर्च होतो. स्टर्लिंगच्या जीवनशैलीनुसार हा खर्च खूपच कमी आहे. आतापर्यंत ते ४० टक्के आत्मनिर्भर झाल्याचं ते सांगतात. काही महिन्यात ते ७० टक्के आत्मनिर्भर होतील असं स्वान म्हणते.