Royal story reality is far from sparkling says the Maharani of Baroda Radhikaraje
बसमधून प्रवास अन् सामान्याप्रमाणे नोकरी; बडोद्याच्या महाराणीची थक्क करणारी कहाणी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 5:42 PM1 / 12भारतात अजूनही अनेक शाही परिवार असे आहेत जे शाही थाटात जीवन जगतात. राजघराण्यातील लोकांचा थाट पाहून लोक थक्क होतात. मात्र, बडोद्याच्या महाराणी राधिकाराजे गायकवाड यांची कहाणी फार वेगळी आहे. राधिकाराजे यांनी शाही परिवाराच्या झगमगत्या दुनियेमागील वास्तव जीवनाशी संबंधित काही खुलासे केले आहेत.2 / 12वांकानेरच्या शाही परिवारात जन्माला आलेल्या राधिकाराजे यांनी बडोद्याच्या महाराजांसोबत लग्न केलं. 'ह्मूमन्स ऑफ बॉम्बे' ला दिलेल्या मुलाखतीत राधिकाराजे म्हणाल्या की, त्या धारण मानत नाही की, त्यांचं जीवन कोणत्याही प्रकारे वेगळं होतं. राधिकाराजे यांचे वडील वांकानेरचे महाराजकुमार डॉक्टर रंजीत सिंहजी हे होते. रंजीत सिंह हे शाही परिवारातील पहिले असे व्यक्ती होते जे राजघराण्याची गादी सोडून आयएएस अधिकारी बनले.3 / 12राधिकाराजे यांनी सांगितलं की, १९व्या शतकातच गायकवाडांचा खजिना किंमती सुंदर वस्तूंनी भरलेला होता. ते इंटरनॅशनल ज्वेलर डीलर बनले होते. त्यांनी जगभरातून किंमत दागिने विकत घेतले. १८६७ मध्ये त्यांनी असा डायमंड खरेदी केला जो कोहिनूरपेक्षाही मोठा होता. 4 / 12या घटनेच्या काही वर्षांनंतर राधिकाराजे यांचा परिवार दिल्लीला शिफ्ट झाला. महाराणी राधिकाराजे यांनी सांगितलं की, त्यांचं जीवन फार सामान्य होतं. त्या म्हणाल्या की, 'मी डीटीसी बसमध्ये शाळेत जात होते आणि याचं सर्व श्रेय माझ्या आईला जातं. ती तिच्या मुलांना आत्मनिर्भर बनवण्यात विश्वास ठेवत होती'.5 / 12राधिकाराजे इंडिया टुडेच्या रॉब रिपोर्ट लिमिटेड एडिशन-२०१८ कार्यक्रमातही आल्या होत्या. यावेळी त्या राजघराण्याच्या परंपरांबाबत मोकळेपणाने बोलल्या होत्या. गायकवाड वंशाच्या इतिहासाबाबत त्या म्हणाल्या की, राजा-महाराजा नेहमीच सुंदर वस्तूंप्रति आकर्षित होते.6 / 12त्या म्हणाल्या की, '२० वर्षांची असताना मला इंडियन एक्सप्रेसमध्ये लेखिका म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासोबतच मी माझी मास्टर डिग्रीही मिळवली. मी माझ्या परिवारात एकुलती एक अशी महिला होते जी नोकरी करत होती. माझ्या जास्तीत जास्त चुलत भावांची लग्ने ते २१ वर्षांचे असताना झाली होती'.7 / 12राधिकाराजे यांनी तीन वर्षे पत्रकार म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यासाठी मुलगा शोधणं सुरू केलं. राधिकाराजे सांगतात की, 'बडोद्याचे राजकुमार समरजीत यांना भेटण्याआधी मी आणखी काही मुलांना भेटले होते. समरजीत यांचे विचार इतरांपेक्षा वेगळे होते. जेव्हा मी त्यांना म्हणाले की, मला पुढे शिकायचं आहे. तर त्यांनी मला प्रोत्साहित केलं'.8 / 12त्या पुढे म्हणाल्या की, लग्न केल्यावर आआणि बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये त्यांना त्यांची खरी ओळख मिळाली. त्या म्हणाल्या की, 'बडोदा महालाच्या भींतींवर राजा रवि वर्मा यांच्या पेंटींग्स लावल्या होत्या. मी विचार केला की, या पेंटिंग्सने प्रेरित विणकामाच्या टेक्नीक्सना नवं केलं तर. याप्रकारे मी स्थानिक विणकाम करणाऱ्यांना सशक्त बनवू शकत होते. मी याची सुरूवात केली आणि त्यात मला यशही आलं. मुंबईतील आमच्या एक्झिबिशनला मोठा प्रतिसाद मिळाला'.9 / 12महाराणी राधिकाराजे यांनी लॉकडाऊन दरम्यान अनेक गरजू कारागिरांची मदतही केली. त्या म्हणाल्या की, 'मी आणि माझ्या बहिणीन गावांचा दौरा केला आणि सोशल मीडियावर पोस्ट करणं सुरू केलं होतं. त्यानंतर मोठ्या संख्येने लोक मदतीसाठी पुढे आले होते. काही दिवसात ७०० पेक्षा जास्त परिवारांना आम्ही मदत केली'.10 / 12शेवटी राधिकाराजे म्हणाल्या की, 'कधी कधी लोक स्वत:हून असा विचार करतात की, महाराणी असणं म्हणजे डोक्यावर मुकूट ठेवून रहायचं. पण वास्तव या झगमगाटापेक्षा वेगळं आहे. मी पारंपारिक रूढी तोडल्या आणि आपल्या सीमा स्वत: तयार केल्या. मी तेच केलं ज्याची लोकांना माझ्याकडून अपेक्षा नव्हती. हे संस्कार मी माझ्या मुलींना देत आहे. जेणेकरून त्यांना त्यांचं जीवन जगता येईल आणि कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होणार नाही'.11 / 12राधिकाराजे इंडिया टुडेच्या रॉब रिपोर्ट लिमिटेड एडिशन-२०१८ कार्यक्रमातही आल्या होत्या. यावेळी त्या राजघराण्याच्या परंपरांबाबत मोकळेपणाने बोलल्या होत्या. गायकवाड वंशाच्या इतिहासाबाबत त्या म्हणाल्या की, राजा-महाराजा नेहमीच सुंदर वस्तूंप्रति आकर्षित होते.12 / 12राधिकाराजे यांनी सांगितलं की, १९व्या शतकातच गायकवाडांचा खजिना किंमती सुंदर वस्तूंनी भरलेला होता. ते इंटरनॅशनल ज्वेलर डीलर बनले होते. त्यांनी जगभरातून किंमत दागिने विकत घेतले. १८६७ मध्ये त्यांनी असा डायमंड खरेदी केला जो कोहिनूरपेक्षाही मोठा होता. आणखी वाचा Subscribe to Notifications