शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'इथे' रस्त्याचं खोदकामात करताना सापडलं ५ हजार वर्ष जुनं हरवलेलं शहर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 1:18 PM

1 / 5
उत्तर इस्त्राइलमध्ये पुरातत्ववाद्यांनी कांस्य युगाच्या सुरूवातीच्या काळातील एका शहराचे अवशेष शोधले आहेत. हरवलेलं हे शहर एका हायवेचं खोदकाम करताना आढळून आलं. हे शहर इस्त्राइलच्या तेल अवीव शहरापासून साधारण ५० किलोमीटर दूर अंतरावर आहे. (Image Credit : Assaf Peretz/Israel Antiquities Authority)
2 / 5
पुरातत्ववाद्यांनुसार, हे शहर ५ हजार वर्ष जुनं आहे. जे आजच्या न्यूयॉर्क शहरासारखं असल्याचं सांगितलं जात आहे. असे मानले जात आहे की, १६० एकरमध्ये असलेल्या या प्राचीन शहरात अंदाजे साधारण पाच ते सहा हजार लोक राहत होते.
3 / 5
या शहराला कांस्य युगातील विकसित सभ्यतेपैकी एक मानलं जात आहे. या शहराचं नाव एन एसुर आहे. या शहराच्या शोधामुळे हजारो वर्षांपूर्वी शहरीकरण कसं होत होतं हे दाखवत आहेत.
4 / 5
इथे खोदकामादरम्यान पुरातत्ववाद्यांना अनेक इमारती, रस्ते, गल्ल्या आणि किल्लेबंदीचे अवशेष मिळाले आहेत. त्यासोबतच इथे मंदिर मूर्ती, मातीची भांडी आणि जळालेल्या जनावरांची हाडे आणि रक्तही आढळून आलं आहे. असे मानलं जात आहे की, या जनावरांचा बळी दिला गेला होता.
5 / 5
इस्त्राइलच्या पुरातत्ववाद्यांनुसार, इथे राहणाऱ्या नागरिकांचे इतर क्षेत्रांसोबत आणि राज्यांसोबत कृषि आणि व्यावसायिक संबंध राहिले असतील. इथे काही दगडांची खेळणी देखील सापडली आहेत. ज्याद्वारे हजारो वर्षांआधीची संस्कृती कळून येते.
टॅग्स :Israelइस्रायलJara hatkeजरा हटकेhistoryइतिहास