rural bees are more hardworking than urban bees new research showes
शहरातील मधमाश्यांपेक्षा गावातील मधमाश्या जास्त कष्टाळू, करतात शहरी मधमाश्यांपेक्षा जास्त मेहनत By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 8:36 PM1 / 10तुम्ही अनेकदा असं काही व्यक्तींबद्दल ऐकलं असेल की त्या व्यक्ती प्रचंड मेहनती आहेत. पण तीच गोष्ट कीटकांनाही लागू होते का? मधमाश्यांविषयीच्या ताज्या संशोधनात याबाबत एक विशेष माहिती समोर आली आहे.2 / 10लंडनमधील व्हर्जिनिया आणि रॉयल हॉलोवे विद्यापीठाच्या संशोधकांनी मधमाश्यांच्या २० पोळ्यांचे विश्लेषण केलं. त्यांनी या पोळ्यांमध्ये मधमाशांचं २ हजार ८०० वेळा विश्लेषण केलं.3 / 10मधमाश्या फक्त एकमेकांशी एक विशेष प्रकारचे वॅगल नृत्य सादर करून संवाद साधतात आणि वॅगल नृत्याद्वारे ते अन्नाचा ठावठिकाणा लावतात.4 / 10संशोधकांनी मधमाश्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं. संशोधनादरम्यान, संशोधकांना आढळलं की शहरांमध्ये राहणाऱ्या मधमाश्या अन्नाच्या शोधात सरासरी ४९२ मीटर अंतर प्रवास करतात.5 / 10तर खेड्यांमध्ये राहणाऱ्या मधमाश्या अन्नासाठी ७४३ मीटर पर्यंत प्रवास करतात. म्हणजेच ग्रामीण मधमाश्या शहरी मधमाश्यांपेक्षा ५० टक्के अधिक अंतर व्यापतात.6 / 10संशोधकांना असं आढळून आलं की शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात राहणाऱ्या मधमाशांनी गोळा केलेल्या मधाच्या प्रमाणात काही विशेष फरक नाही.7 / 10शहरात अनेक ठिकाणी मोठमोठे पार्क तसेच लहान बागा आहेत, शहरी मधमाश्यांना तिथून मध गोळा करण्यासाठी मदत मिळते.8 / 10संशोधक एली लीडबीटर म्हणतात की शहरी उद्याने मधमाशांसाठी हॉटस्पॉट आहेत. येथे विविध फुलांच्या अनेक जाती लावल्या आहेत.9 / 10दुसरीकडे, मधमाश्यांना शहरांपेक्षा ग्रामीण भागात त्यांचे अन्न शोधण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यासाठी त्यांना लांबचा प्रवासही करावा लागतो.10 / 10खेड्यात दिसणाऱ्या मधमाश्या शहरी मधमाश्यांपेक्षा जास्त मेहनती असतात आणि अन्नाच्या शोधात ५० टक्के अधिक अंतर प्रवास करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications