Russia sent trained killer dolphin fish army in syria for war
बाबो! रशियाने तयार केली घातक डॉल्फिन माशांची सेना, सीरियामध्ये घालत आहेत धुमाकूळ.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 1:59 PM1 / 13सुपरपॉवर रशियाने युद्ध जिंकण्यासाठी एक भारी शस्त्र तयार केलंय. आपल्या आण्विक शस्त्रास्त्रांनी पृथ्वीला अनेकदा उद्धस्त करू शकणारा रशिया आता जगातल्या सर्वात बुद्धीमान माशांमधील डॉल्फिनच्या मदतीने युद्ध जिंकण्याच्या तयारीत आहे. 2 / 13सॅटेलाइट द्वारे मिळालेल्या ताज्या फोटोंमधून याचा खुलासा झाला आहे की, रशियाने गृहयुद्ध सुरू असलेल्या सीरियात आपल्या पाणबुड्यांसोबत प्रशिक्षित डॉल्फिन मासेही तैनात केले आहेत. चला जाणून घेऊ ऱशियाच्या या अनोख्या फौजेबाबत...3 / 13रशियाच्या नौसेनेने अमेरिकेला उत्तर देण्यासाठी ९० च्या दशकात मरीन मॅमल प्रोजेक्ट सुरू केला होता. रशियाच्या या प्रोजेक्टकडे जगाचं लक्ष तेव्हा वेधलं गेलं जेव्हा बेलुगा नावाचा व्हेल मासा एप्रिल २०१९ मध्ये नॉर्वेला पोहोचला. या व्हेल माशाला हवल्दीमीर नाव देण्यात आलं होतं. 4 / 13हा व्हेल मासा रशियाच्या नैौसेनेच्या ट्रेनिंग प्रोग्राममधून पळाला होता. आता रशियाने युद्धग्रस्त सीरियाजवळ आपली डॉल्फिन सेना तैनात केली आहे. रशियाला ही भीती सतावत आहे की, दुश्मन समुद्रामार्गे पाणबुड्यांवर हल्ला करू शकतो.5 / 13तज्ज्ञांनुसार, डॉल्फिनचा वापर दुश्मनांच्या डायव्हर्सना निशाणा बनवण्यासाठी केला जातो. रशिया आपल्या पाणबुड्यांच्या मदतीने सीरियावर हल्ले करत आहे.6 / 13सरंक्षण तज्ज्ञांच मत आहे की, या डॉल्फिन्सना असं ट्रेन्ड करण्यात आलं की, ते समुद्राच्या तळावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला शोधू शकतात. सोबतच गुप्त मिशनवरही जाऊ शकतात. 7 / 13सीरियामध्ये तैनात डॉल्फिन्सना क्रीमियाजवळील काळ्या समुद्रातील सेवास्तोपोल अड्ड्यावर पाठवण्यात आलं आहे. 8 / 13रशिया नौसेनेचा आणखी मरीन मॅमल प्रोग्राम आर्कटिक परिसरात चालू आहे. इथे बेलुगा व्हेल मासे आणि Seals या जीवांना प्रशिक्षित केलं जात आहे. 9 / 13असे सांगितले जात आहे की, हवल्दीमीर व्हेल मासा तेव्हा पळाला होता जेव्हा काही व्हेल माशांना ओलेनया गुबा सबमरीन बेसवर नेण्यात येत होतं. 10 / 13ओलेनया बेसवर रशियाच्या गुप्त पाणबुड्या आहेत. बेलुगा व्हेल मासे डॉल्फिनच्या तुलनेत मोठ्या आणि कमी वेगाने चालतात. पण मासे आर्कटिकच्या बर्फाळ पाण्यात जास्त फायदेशीर ठरतात. 11 / 13घातक Seals डायव्हर्सवर हल्ला करण्यात सक्षम आहेत. ओलेनया बेसजवळ रशियानेच एक ब्रीडिंग सेंटर सुरू केलं आहे जिथे या माशांना जन्म दिला जातो.12 / 13सीरियामध्ये तैनात केल्यानंतर रशिया वेगाने आपल्या मरीन मॅमल प्रोजेक्टमध्ये पुढे जात आहे. रशियासोबत अमेरिका आणि इराणही वेगाने मरीन मॅमल प्रोग्राममध्ये पुढे जात आहे. 13 / 13अमेरिकी नौसेनेचा मरीन मॅमल प्रोग्राम १९५९ मध्येच सुरू झाला होता. त्यांचं मुख्यालय कॅलिफोर्नियाच्या प्वाइंट लोमा परिसरात आहे. इथे डॉल्फिन आणि सी लायनला ट्रेनिंग दिलं जातं. आणखी वाचा Subscribe to Notifications