Russian woman married suitcase bought from shop shares romantic bond with objects
आपल्या 'पती'ला हातात घेऊन फिरते ही तरूणी, फोटो बघून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 2:21 PM1 / 7प्रेमाला काही सीमा नसते. प्रेम तर कुणालाही कुठेही कुणासोबतही होऊ शकतं. प्रेम झाल्यावर लोक चूक-बरोबर यातला फरक समजू शकत नाहीत. लोक माणसांच्या प्रेमात पडतात किंवा पाळीव प्राण्यांच्या. पण काही असेही लोक आहेत जे निर्जीव वस्तूंच्या प्रेमात पडतात. अशीत एक वेगळी प्रेमकथा समोर आली आहे. एका तरूणीने सुटकेससोबत लग्न केलंय.2 / 7सोशल मीडियावर या तरूणीची सध्या चर्चा रंगली आहे. या तरूणीचं माणसांपेक्षा जास्त प्रेम निर्जिव वस्तूवर आहे. ती मुलांना डेट करण्याऐवजी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करते आणि त्यांच्यासोबत दु:खं-आनंद शेअर करते. तिचं मत आहे की, ती या वस्तूंकडे आकर्षित होते.3 / 7हे आकर्षण इतकं आहे की, तिने चक्क एका सुटकेससोबत लग्न केलंय. रेन गॉर्डन नावाच्या या महिलेने सांगितले की, तिला व्यक्तीपेक्षा लाख पटीने जास्त या सुटकेससोबत जवळीकता वाटते.4 / 7असं नाही की, रेनने कधी पुरूषाला डेट केलं नाही. २०१७ मध्ये ती एका व्यक्तीला डेट करत होती. पण त्या व्यक्तीला हे जाणवलं की, तिचं त्याच्यापेक्षा घरातील वस्तूंवर अधिक प्रेम आहे. त्यामुळे त्याने ब्रेकअप केलं.5 / 7रेन आता तिच्या पतीला म्हणजे सुटकेसला गिडियॉन असं नाव दिलंय. तिने ही सुटकेस २०१५ मध्ये खरेदी करून आणली होती. ती अनेक तास या सुटकेसकडे बघत बसायची. नंतर ती हळू हळू सुटकेसच्या प्रेमात पडली. 6 / 7रेन आता तिच्या पतीला म्हणजे सुटकेसला गिडियॉन असं नाव दिलंय. तिने ही सुटकेस २०१५ मध्ये खरेदी करून आणली होती. ती अनेक तास या सुटकेसकडे बघत बसायची. नंतर ती हळू हळू सुटकेसच्या प्रेमात पडली. 7 / 7रेन आता तिच्या पतीला म्हणजे सुटकेसला गिडियॉन असं नाव दिलंय. तिने ही सुटकेस २०१५ मध्ये खरेदी करून आणली होती. ती अनेक तास या सुटकेसकडे बघत बसायची. नंतर ती हळू हळू सुटकेसच्या प्रेमात पडली. आणखी वाचा Subscribe to Notifications