Sarkmouth catfish found in sindh river after ganga scientists claim threat ecosystem amazon behind
धोका वाढला! गंगेनंतर आता सिंधू नदीत सापडला अमेरिकेतील मासा; तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 12:32 PM1 / 6मध्य प्रदेशातील भिंडच्या सिंधू नदीत सकरमाऊथ कॅटफिश आढळून आल्यामुळे लोक हैराण झाले आहेत. दक्षिण अमेरिकेतील दिसून येणारा मासा आहे. मूळ स्वरूपात दक्षिण अमेरिकेच्या अमॅझॉन नदीत हा मासा आढळून येतो. हा मासा भोले नावाच्या एका गृहस्थाने सिंधू नदीच्या मेहदा घाटावर पकडला आहे. 2 / 6हा मासा मासांहारी असून दक्षिण अमेरिकेत दिसून येणारा हा मासा चंबळ परिसरातील सिंधू नदीत पोहोचला कसा? यावर संशोधकांचे अधिक संशोधन सुरू आहे. 3 / 6या आधी गंगा नदीतल्या डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला होता. सातासमुद्रापार आढळून येणारा मासा गंगेत सापडण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला होता सकरमाऊथ कॅटफिश आढळून येताच बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी त्यावर संशोधन केलं होतं. यानंतर या माशाची ओळख पटली.4 / 6बीएचयूचे प्राध्यापक बेचनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍमेझॉन नदीत सापडणाऱ्या सकरमाऊथ कॅटफिशमुळे गंगा नदीतल्या माशांना मोठा धोका आहे. सकरमाऊथ कॅटफिश मांसाहारी असतो. त्यामुळे पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. रामनगरच्या रमना गावाजवळ सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला होता. बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भागात आणखी सकरमाऊथ कॅटफिश आहेत का, याचा शोध सध्या घेतला जात आहे.5 / 6सकरमाऊथ कॅटफिश वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. हा मासा गंगेत आल्यामुळे मोठा धोका निर्माण होत आहे. कारण हा मासाहारी मासा असल्यामुळे आजूबाजूच्या जीवजंतूना खाऊन हा मासा जीवंत राहतो. त्यामुळे या माश्याच्या असण्याने इतर जीवजंतूंचे अस्तित्व धोक्यात येऊ शकतं.6 / 6तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीतल्या माशांची संख्या जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. यामागे परदेशी मासे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याआधीही गंगा नदीमध्ये कॅटफिश आढळून आले होते. यानंतर आता सिंधू नदीत सकरमाऊथ कॅटफिश सापडल्यानं चिंता वाढली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications