शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ocean Planet : या ग्रहावर आहे अंतराळातील सर्वात मोठा महासागर, वाचा कसा आहे हा रहस्यमय ग्रह!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 12:12 PM

1 / 7
अंतराळात असे कितीतरी रहस्य लपलेले आहेत ज्यावरून वैज्ञानिक अजूनही पडदा उठवू शकलेले नाहीत. हे रहस्य जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक सतत काहीना काही शोध करत असतात. अशात वैज्ञानिकांनी एका ग्रहाचा शोध लावला ज्याबाबत वाचल्यावर तुम्ही हैराण व्हाल. वैज्ञानिकांनी ज्या ग्रहाचा शोध घेतला आहे, त्यावर काय आहे हे वाचाल तुम्ही अवाक् व्हाल.
2 / 7
वैज्ञानिकांनी पृथ्वीपासून 100 प्रकाश वर्ष दूर एका समुद्री ग्रहाचा शोध लावला आहे. सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, हा ग्रह पाण्याच्या एका जाड थराने झाकलेला आहे. याची बनावट शनि ग्रहासारखी आहे. या ग्रहाचा आकार आणि पाण्याचं प्रमाण पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पण तो त्याच्या ताऱ्यांपासून फार दूर आहे, ज्यामुळे या ग्रहावर जीवन असण्याची शक्यता नाही.
3 / 7
या ग्रहाचं नाव TOI-1452 b आहे जो एक एक्सोप्लॅनेट आहे. हा ग्रह ड्रेको सौरमंडळातील बायनरी सिस्टीममध्ये असलेल्या दोन ताऱ्यांपैकी एकाच्या फेऱ्या मारतो. रिसचर्सच्या एका इंटरनॅशनल टीमने या ग्रहाचा शोध लावला आहे.
4 / 7
यूनिव्हर्सिटी डी मॉन्ट्रिअलचा पीएचडीचा विद्यार्थी आणि इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एक्सोप्लॅनेटचे सदस्य चार्ल्स कॅडियक्स या इंटरनॅशनल टीमचं नेतृत्व करत आहेत. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाच्या स्पेस टेलीस्कोप Tess ने याचा शोध लावला आहे.
5 / 7
Tess प्लॅनेटरी सिस्टीमचा शोध घेत आहे. ज्यासाठी तो पूर्ण आकाशाचा सर्व्हे करत आहे. Tess च्या एका सिग्नलेमध्ये थोडी चमक कमी दिसत होती आणि असं सतत 11 दिवस होत राहिलं. यामुळे वैज्ञानिक या ग्रहाला शोधू शकले ज्याचा 70 टक्के भाग पाण्याने भरला आहे.
6 / 7
वैज्ञानिकांकडून शोधण्यात आलेल्या या एक्सोप्लॅमेटचा TOI-1452 हा होस्ट स्टार आहे. जो आपल्या सूर्यापेक्षा खूप लहान आहे. हे दोघेही एकमेकांची परीक्रमा करतात. हे होत असताना यांच्यातील अंतरही फार असतं.
7 / 7
तज्ज्ञांचं मत आहे की, पृथ्वीप्रमाणे TOI-1452 b सुद्धा एक डोंगराळ ग्रह असू शकतो. पण याचा आकार, पाण्याचं प्रमाण आणि घनत्व बघता हे समजलं की, हा ग्रह आपल्या ग्रहापेक्षा खूप वेगळा आहे.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके