self proclaimed time traveller predicts aliens will land on earth on december 8 this year
"8 डिसेंबरला पृथ्वीवर एलियन्स उतरणार, माणसांशी संवाद साधणार"; 'या' व्यक्तीच्या दाव्याने खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 1:01 PM1 / 7पृथ्वीप्रमाणेच अंतराळात कुठं जीवसृष्टी आहे का?, असेल तर ती कुठं आणि कशी असेल याविषयी गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. एलियन्स (Aliens) अर्थात परग्रहावरच्या जीवांचा शोध सुरूच आहे. वेगवेगळे सिनेमे, यूट्यूबवरच्या व्हिडिओंमध्ये एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल दावे केले जातात. 2 / 7एलियन्स हा सर्वांच्या उत्सुकेतेचा विषय आहे. संशोधकही यावर फार संशोधन करत आहेत. त्यांनाही अद्याप एलियन्सबद्दल कोणतंही रहस्य उलगडण्यास यश मिळालं नाही. आपल्या पृथ्वीशिवाय अवकाशात इतर ठिकाणी सजीवसृष्टी असावी असा अंदाज संशोधक लावतात. पण यातील काही ठोस त्यांना अद्याप सापडलेले नाही. 3 / 7एलियन्स खरोखर अस्तित्वात आहेत की नाही? टाइम ट्रॅव्हलिंग शक्य आहे का? या प्रश्नांची उत्तर अद्याप शास्त्रज्ञांनाही मिळालेली नाहीत. हे गूढ आजपर्यंत कोणीही सोडवू शकलेले नाही. मात्र जगातील अनेकांनी याबाबत वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आहेत. अशाच एका दाव्याची जोरदार चर्चा होत आहे, जो दावा हैराण करणारा आहे. या वर्षी 8 डिसेंबरला एलियन्स पृथ्वीवर उतरतील, असा दावा एका स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने केला आहे.4 / 7डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, व्यक्तीने टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने एलियन्स आणि स्वत: टाइम ट्रॅव्हलर असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या व्हिडिओने संपूर्ण जगात एकच खळबळ माजवली आहे. डिसेंबर महिन्यात एलियन्स पृथ्वीवर येऊन माणसांशी संवाद साधणार असंही म्हटलं आहे. 5 / 7या स्वयंघोषित टाईम ट्रॅव्हलने आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी यासंबंधीचे काही व्हिडीओ आणि फोटो देखील दाखवले आहेत. मात्र शास्त्रज्ञांनी पुराव्याच्या आधारे एलियन्स असल्याचा दावा अद्याप मान्य केलेला नाही. 6 / 7व्यक्तीच्या दाव्यानुसार, या वर्षी 30 नोव्हेंबर जेम्स वेब टेलिस्कोप एक नवीन ग्रह शोधेल, जो पृथ्वीसारखाच असेल. त्याचवेळी त्यांनी असा दावाही केला आहे की, यावर्षी आठ डिसेंबरला एक उल्का पृथ्वीवर धडकणार आहे.7 / 7व्यक्तीने असा दावा केला आहे की मार्च 2023 मध्ये वैज्ञानिकांची एक टीम प्राचीन प्रजाती शोधून काढेल. तसेच मे 2023 मध्ये अमेरिकेत भयानक त्सुनामी येईल. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की तो टाइम ट्रॅव्हलर आहे आणि तो 2671 मधून टाइम ट्रॅव्हल करुन परतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications