Shergarh fort where hundreds of tunnels and basements people are afraid to come
४७० वर्ष जुन्या या रहस्यमय किल्ल्यात आहेत शेकडो भुयार, बाहेरून पाहिला तर दिसत नाही! By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 2:15 PM1 / 12राजे आणि सुल्तानांकडून तयार करण्यात आलेले किल्ले वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्ध आहेत. यातील अनेक किल्ले असे आहेत ज्यांना रहस्यमय मानलं जातं. आणि या किल्ल्यांमध्ये शिरण्यास आजही लोक घाबरतात. असाच एक किल्ला बिहारमध्ये आहे. चला या अनोख्या किल्ल्याबाबत जाणून घेऊ..2 / 12हा अनोखा आणि इतर किल्ल्यांपेक्षा वेगळा किल्ला बिहारच्या रोहतास जिल्ह्यात आहे. याला 'शेरगढ किल्ला' असं म्हटलं जातं. असं सांगितलं जातं की, हा किल्ला अफगान शासक शेरशाह सूरीने तयार बांधला होता. या किल्ल्याची खास बाब म्हणजे हा किल्ला डोंगराचा वरचा भाग कापून तयार करण्यात आला. 3 / 12इतकंच नाही तर या किल्ल्यात शेकडो भुयार आहेत आणि तळघरे आहेत. ज्यांबाबत सांगितलं जातं की, आजपर्यंत कुणीही या भुयारांचं गुपित कुणी उलगडू शकलं नाही. या किल्ल्याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत.4 / 12हा किल्ला शेरशाह सूरीने आपल्या दुश्मनांपासून वाचण्यासाठी बांधला होता. तो त्याच्या परिवारासोबत आणि साधारण १० हजार सैनिकांसोबत या किल्ल्यात राहत होता. 5 / 12इथे त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध होत्या. या किल्ल्याची बनावटच अशी होती की, जर दुश्मन कोणत्याही दिशेला १० किलोमीटर अंतरावर असेल तरी तो किल्ल्याहून स्पष्टपणे दिसत होता.6 / 12कैमूरच्या डोंगरात तयार केलेल्या या किल्ल्याची संरचना इतर किल्ल्यांपेक्षा फार वेगळी आहे. हा किल्ला तीन बाजून जंगलाने वेढलेला आहे. तर एका बाजूने दुर्गावती नदी वाहते. हा किल्ला बाहेरून कुणालाही दिसत नाही. 7 / 12हा किल्ला १५४० ते १५४५ दरम्यान बांधण्यात आला. यात शेकडो भुयारी मार्ग बनवण्यात आले होते. जेणेकरून अडचणीच्या वेळी सुरक्षित बाहेर निघता यावं. या भुयारी मार्गांचं रहस्य केवळ शेरशाह सुरी आणि त्याचे काही खास सैनिकच जाणून होते. 8 / 12जमिनीच्या आत बांधलेल्या या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एका भुयारी मार्गातून जावं लागतं. असं म्हटलं जातं की, जर हे भुयारी मार्ग बंद झाले तर हा किल्ला कुणालाही दिसणार नाही.9 / 12असं सांगितलं जातं की, १५७६ मध्ये मुघलांनी या किल्ल्यावर हल्ला केला होता. तेव्हा शेरशाह सुरीच्या नातेवाईकांना आणि त्याच्या शेकडो सैनिकांना संपवलं होतं. तसेच किल्ल्यावर ताबा मिळवला होता. शेरशाह सुरीचा खजिनाही या किल्ल्यात दडला असल्याचं सांगितलं जातं. पण आजपर्यंत तो कुणालाही सापडला नाही. 10 / 12इथे भुयारी मार्गांचं जाळं इतक्या रहस्यमय पद्धतीने परसलं आहे की, लोक आजही या किल्ल्यात जाण्यापासून घाबरतात. ज्यामुळे हा किल्ला आजही लोकांसाठी भीतीचं ठिकाण बनून आहे.11 / 12इथे भुयारी मार्गांचं जाळं इतक्या रहस्यमय पद्धतीने परसलं आहे की, लोक आजही या किल्ल्यात जाण्यापासून घाबरतात. ज्यामुळे हा किल्ला आजही लोकांसाठी भीतीचं ठिकाण बनून आहे.12 / 12इथे भुयारी मार्गांचं जाळं इतक्या रहस्यमय पद्धतीने परसलं आहे की, लोक आजही या किल्ल्यात जाण्यापासून घाबरतात. ज्यामुळे हा किल्ला आजही लोकांसाठी भीतीचं ठिकाण बनून आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications