शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल चार्जरमुळे दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, 'या' देशात ३५५ लोक गेले विजेच्या झटक्याने

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 6:44 PM

1 / 10
पुर्व ब्राझीलच्या एरेरे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल फोनच्या चार्जरला हात लावल्याने एका दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.
2 / 10
स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार मोबाईल चार्जरला हाताळताना लागलेल्या विजेच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला.
3 / 10
त्या २ वर्षाच्या मुलीचे नाव सारा डी अल्बुकर्क असे असून तिला शॉक लागल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तिथेच तिचा मृत्यू झाला.
4 / 10
दिलेल्या रिपोर्टमध्ये हा मृत्यू होण्यास कारणीभूत असलेला चार्जर कोणत्या ब्रँडचा होता हे म्हटलेले नव्हते. मात्र साराला अनेकांनी श्रद्धांजली वाहिली
5 / 10
तेथील स्थानिक मेयर इमानुएल गोम्स मार्टिंस यांनी फेसबुकवर साराला श्रद्धांजली दिली.
6 / 10
फेसबुक युजर विवियन गोम्स फ्रिटास यांनी लिहिले की, रेस्ट इन पीस सारा, तु आता एक छोटीशी दोन पंखांची परी झाली आहेस.
7 / 10
सेलिया पावा नावाच्या सोशल मिडिया युजरने लिहिले की अशावेळी भावना शब्दांमध्ये व्यक्त करणं कठीण होतं. मी साराच्या आईवडिलांना आणि कुटुंबियांना हे सहन करण्याची शक्ती देण्याची प्रार्थना करते.
8 / 10
ब्राझीलमध्ये गेल्यावर्षी ३५५ लोकांचा विजेच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. यामध्ये एका २८ वर्षीय युवकाचाही समावेश होता.
9 / 10
किट्टीसाक मुनुकिट्टी असे त्या युवकाचे नाव होते. तो मृत झाला त्यावेळी त्याच्या हातात मोबाईलचा हँडसेट होता. आणि हातावर जळलेल्याच्या जखमा होत्या.
10 / 10
पश्चिम थायलंडच्या चोनाबुरी येथे राहणाऱ्या एका रि्न्नापोर्न नावाच्या आईने २०१९ साली अशीच घटना पाहिली होती
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेDeathमृत्यू