शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

म्हणून हिवाळ्याच्या दिवसांत तोंडामधून निघते वाफ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 10:40 PM

1 / 6
सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. या दिवसांमध्ये तोंडामधून वाफ का निघते हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल. मग आज जाणून घेऊया हिवाळ्यात असे का होते ते.
2 / 6
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तोंडातून वाफ निघण्याचे कारण तसे सामान्यच आहे.
3 / 6
आपण श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय ऑक्साईड सोडतो, असे सर्वसाान्यपणे सांगितले जाते. मात्र ते पूर्ण सत्य नाही. आपण श्वास सोडताना केवळ कार्बन डाय ऑक्साईड सोडत नाही तर कार्बन डाय ऑक्साईडसोबत इतर वायू आणि बाष्पही नाकावाटे बाहेर फेकले जातात.
4 / 6
जेव्हा आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा बाहेर येणारे बाष्प थंडीच्या दिवसांत तापमान कमी असल्याने द्रवरूप घेते.
5 / 6
त्यामुळे थंडीमध्ये आपण जेव्हा तोंडाद्वारे श्वास सोडतो तेव्हा वाफ आल्यासारखे दिसते.
6 / 6
तोंडातून वाफ येणे हेे पूर्णपणे तापमानावर अवलंबून असते. त्यामुळे बऱ्याचदा घरात बसल्यावर तोंडातून वाफा येत नाहीत. मात्र बाहेर गेल्यावर तोंडातून वाफ आल्याचे दिसते.
टॅग्स :Temperatureतापमान