Some interesting facts about krem puri cave meghalaya
भारतातील सर्वात खतरनाक भूलभुलैया; एकदा आत गेलं की बाहेर येणं अशक्यच! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 6:48 PM1 / 8भारतात अशी काही ठिकाणं आहेत की तेथील रहस्यमय गोष्टींमागचं सत्य आजवर समोर आलेलं नाही. यात गुहा, किल्ले आणि इतर ठिकाणांचा समावेश आहे. 2 / 8भारतातील मेघालय येथील अशाच एका ठिकाणाची जोरदार चर्चा आहे. येथील एक गुहा रहस्यमय गोष्टींसाठी ओळखली जाते. 3 / 8मेघालय येथील क्रेम पुरी नावाच्या गुहेबाबत अनेक रहस्यमय कहाण्या सांगितल्या जातात. २०१६ साली शास्त्रज्ञांच्या एका टीमनं या गुहेचा शोध लावला होता. 4 / 8वालुकामय दगडांची ही जगातील सर्वाधिक लांबीची गुहा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. 5 / 8अतिशय भयावह दिसणाऱ्या या गुहेचं प्रवेशद्वार देखील उंच आणि तीक्ष्ण खडकांचं असून अंगावर काटा आणणारं आहे. 6 / 8सर्वाधिक पाऊस होण्यासाठी लोकप्रिय असलेल्या मासिनरामच्या हिरव्यागार पर्वतरांगांमध्ये ही गुहा तब्बल १३ किलोमीटर इतकी पसरली आहे. गुहेत तापमान १६ ते १७ डिग्री सेल्सियस इतकं असतं. 7 / 8व्हेनेझुएला येथील क्यूवा डेल समन नावाच्या गुहेची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या गुहेची लांबी ६ हजार मीटरपेक्षाही अधिक आहे. पण क्रेम पुरी गुहा क्यूवा डेल समन गुहेपेक्षाही लांब असल्याचं सिद्ध झालं आहे. 8 / 8गुहेचा शोध घेतलेल्या मेघालय अॅडवेंचर असोसिएशननं या गुहेचं नाव क्रेम पुरी असं ठेवलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications