शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रेम म्हणजे नक्की काय असतं?; २९ वर्षीय मुलीचं ८० वर्षाच्या वृद्धाशी लग्न; प्रश्न विचारणाऱ्यांना दिलं ‘हे’ उत्तर

By प्रविण मरगळे | Published: February 10, 2021 3:04 PM

1 / 10
असं म्हणतात की, खरं प्रेम कधी आणि कोणावर होईल हे सांगणं कठीण आहे. याचा प्रत्यय दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आला आहे, याठिकाणी २९ वर्षीय विद्यार्थीनीला ८० वर्षाच्या वृद्धासोबत प्रेम जडलं आहे, या दोघांनी लग्नही केले. या दोघांच्या वयात जवळपास ५१ वर्षाचं अंतर आहे.
2 / 10
नववधु तेरजेल रासमुसने सांगितले की, माझे पती विल्सन रासमुस हे माझी खूप काळजी घेतात. तसेच मी त्यांच्या मुलाची सावत्र आई बनू शकत नाही कारण त्यांचे वय ३० वर्ष आहे. या प्रेमाची सुरूवात झाली कशी? जाणून घेऊया या अनोख्या प्रेमाची कथा
3 / 10
तेरजेलने सांगितले की, या प्रेमाची सुरूवात २०१६ मध्ये झाली होती, स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यक्रमात या दोघांनी एकमेकांना पाहिलं आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, प्रेम झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट केले. या प्रेमामुळे विल्सन यांना वृद्धापकाळात काळजी घेणारी पत्नी भेटली तर तेरजेलला एक बुद्धिमान पती भेटल्याने जीवनाचा अनुभव मिळाला.
4 / 10
तेरजेलची आई आणि तिच्या कुटुंबीयांनी या नात्याचा स्वीकार केला. या लग्नात विल्सन यांची ५६ वर्षीय मुलगी साक्षीदार बनली, आता हे नवं जोडपं एकत्र राहतं, विल्सन हे आर्थिक दृष्ट्या तेरजेलला मदत करतात कारण ती पुढील शिक्षण पूर्ण करू शकेल.
5 / 10
तेरजेल यांनी सांगितले की, विल्सन त्यांच्या आयुष्यात अचानक आले, आम्ही एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात भेटलो, मी तिथे पत्रकार म्हणून गेली होती, त्यावेळी तिथे फोटो घेत होती, त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर कार्यक्रमाचा आनंद घेत होती, तेव्हा विल्सन यांनी मला शेजारी बसू का अशी विचारणा केली. विल्सन यांनी पाहिलं की मी एकटी आहे, त्यामुळे दोघं एकमेकांना सोबत देऊ शकतात.
6 / 10
तेव्हापासूनच विल्सन यांच्या प्रेमाला सुरूवात झाली. हे माझं खूप काळ टिकणारं प्रेम आहे, जोपर्यंत मी विल्सनला भेटली नाही तोपर्यंत मी कधीही प्रेमाचा गांभीर्याने विचार केला नव्हता
7 / 10
आमच्या भेटीनंतर ३ महिन्यांनी मला माहिती पडले विल्सन लग्न करू इच्छितात. त्यांचे आधी लग्न झाले आहे आणि ते त्यांचे पहिलं प्रेम होतं. विल्सनच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू २००२ मध्ये झाला
8 / 10
त्यानंतर विल्सन यांनी कोणत्या महिलेला डेट केलं नाही. विल्सन माझ्यासोबत सगळं काही शेअर करत होता, माझी खूप मदतही करत होता, जेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा अंत्यसंस्कारावेळीही त्यांनी खूप मदत केली. मृत्युनंतरची सगळे विधी कसे करायचे हे सांगितले.
9 / 10
इतकचं नाही तर माझ्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांमध्ये विल्सन मदत करत होते, माझ्या शिक्षणासाठीही त्यांनी आर्थिक मदत केली. विल्सन यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती नाही ही समस्या आहे, ८० वर्षाचे असल्याने त्यांना ते लगेच कळत नाही असं तेरजेलने सांगितले. तर तेरजेलसोबत मी कधी नात्यात येईन असं वाटलं नव्हतं असं विल्सन यांनी सांगितले.
10 / 10
तेरजेलसोबत राहिल्याने मला खूप निरोगी आणि बरं वाटतं, कोणत्या तरूण मुलीसोबत लग्न करण्याऐवजी मी वयोवृद्ध महिलेशी लग्न करावं असं वाटत होतं, कारण आम्ही दोघं एक गोष्ट एकत्र करू शकतो, तेरजेल माझी वृद्धापकाळात मदत करते याचा मला खूप आनंद आहे. आमच्या घरच्यांनी या नात्याचा स्वीकार केला
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्न