South African couple Olivia and Raul De Freitas stranded in Maldives due to coronavirus lockdown api
सहा दिवस हनीमूनसाठी मालदीवला आले, आता तर घरासाठी जमा केलेले पैसेही संपत आलेत! By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 4:27 PM1 / 10कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. यात हनीमूनला गेलेले अनेक नवीन जोडपेही अडकून पडले आहेत. दक्षिण आफ्रिकेतील ओलिविया आणि रॉल डी फ्रेइटास हनीमूनसाठी मालदीवला गेले होते. पण कोरोना व्हायरसमुळे ते तिथेच अडकले. दक्षिण आफ्रिकेतही लॉकडाऊन आहे आणि मालदीवमध्येही. (Image Credit : nytimes.com) 2 / 10न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, ओलिविया आणि रॉल 22 मार्चला मालदीवला पोहोचले होते. त्यांचा इथे सहा दिवस थांबण्याचा प्लॅन होता. पण आता 15 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून ते अडकून बसले आहेत. अजूनही घरी परत जाण्याचा काही मार्ग समोर येत नाहीये. (Image Credit : nytimes.com) 3 / 1027 वर्षीय ओलिविया ही शिक्षिका आहे आणि 28 वर्षांचा रॉल हा कसाई आहे. जे जेव्हा मालदीवला जाण्याची तयारी करत होते तेव्हा कोरोनाचं संकट नेमकं सुरू झालं होतं. पण दोघांनाही ट्रॅव्हल एजंटने सांगितले की, चिंता करू नका. पुढे काही झालं तर दक्षिण आफ्रिकेतील लोकांना घरी पोहोचवलं जाईल. जा आणि मजा करा. (Image Credit : nytimes.com) 4 / 10ओलिविया आणि रॉल ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते. तिथे त्यांच्या व्यतिरिक्त कुणीही पर्यटक नव्हते. भलेही ते रिसॉर्टमध्ये एकटे गेस्ट होते. पण त्यांच्या सेवेसाठी स्टाफ तैनात होता. रिसॉर्टनुसार, रूम बॉय दिवसातून 4 ते 5 वेळा त्यांना काय हवं काय नको याची चौकशी करत होता. सकाळी नाश्त्यावेळही अनेक वेटर असायचे.5 / 10ओलिवियाने न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, 'आमच्याकडे खूप वेळ आहे. पण हे जरा विचित्र आहे. सगळे म्हणतात की, त्यांना एखाद्या आयलंडवर अडकून पडायची इच्छा आहे. पण हे तोपर्यंत चांगलं वाटतं जोपर्यंत तुम्ही फसत नाहीत. तुम्ही घरी जाऊ शकणार आहात हे माहीत असल्यावरच ते चांगलं वाटतं'. (Image Credit : nytimes.com) 6 / 10दरम्यान ओलिविया आणि रॉलचे सेव्हिंगही आता कमी होत आहे. ज्या रिसॉर्टमध्ये ते थांबले आहेत त्या रिसॉर्टचं एका रूमचं दिवसांचं भाडं 750 डॉलर म्हणजे 50 हजार रूपये आहे. ते सहा दिवसांसाठी आले होते आणि तर 9 दिवस झाले. रिसॉर्टने त्यांना नंतर डिस्काउंट दिलं. पण त्यांचे आता जे पैसे खर्च होत आहेत ते त्यांनी घर घेण्यासाठी जमा केले होते. 7 / 10दक्षिण आफ्रिकेत 16 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. 1 एप्रिलला दक्षिण आफ्रिकेत सर्व एअरपोर्ट बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण ओलिविया आणि रॉल जाऊ शकले नाही. रिपोर्टनुसार, दोघांनी आधी मालदीवमधील दक्षिण आफ्रिकेच्या दुतावासासोबत संपर्क केला. नंतर श्रीलंकेतील दुतावासासोबत संपर्क केला.8 / 10इथे त्यांना सांगण्यात आलं की, दक्षिण आफ्रिकेतील इथे आणखी 40 लोक आहेत. सर्वांना घेऊन जाण्यासाठी एक चार्टर प्लेन भाड्याने करावं लागेल. त्याचं भाडं 80 लाख रूपये आहे. ते तुम्हाला सगळ्यांना द्यावं लागेल. पण यात अडचण आली.9 / 10दक्षिण आफ्रिकेतील सरकार केवळ 20 लोकांशी संपर्क करू शकले. यातील अनेकांनी पैसे देण्यास नकार दिला. तर काहींकडे पैसे नव्हतेच. चार्टर विमान भाड्याने करायचा प्लॅन फिस्कटला.10 / 105 एप्रिलला ओलिविया आणि रॉल यांना दुतावासातून फोन आला. त्यांना एका तासात रिसॉर्ट सोडण्यास सांगण्यात आले. त्यांना दुसऱ्या रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं. तिथे दक्षिण आफ्रिकेतील आणखीही लोक आहेत. आता ते सगळे घरी परत जाण्याची वाट बघत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications