शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंतराळवीराचा Space मध्ये मृत्यू झाल्यावर मृतदेहाचे काय होईल? असा आहे NASA चा प्रोटोकॉल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 5:55 PM

1 / 8
Space Programs: भारतासह जगभरातील अनेक देश त्यांच्या अंतराळ कार्यक्रमांचा विस्तार करण्यात गुंतले आहेत. अंतराळात दडलेले विविध रहस्य शोधण्यासाठी गेल्या सहा दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत.
2 / 8
चंद्रावर पाऊल ठेवणारा अमेरिका हा एकमेव देश आहे. भारत देखील गगनयानच्या माध्यमातून पुढच्या वर्षी प्रथमच अंतराळात मानव पाठवण्याची तयारी करत आहे. पण, अशा धोकादायक मोहिमेत अंतराळवीरांचा मृत्यू झाला, तर काय? असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आला असेल.
3 / 8
अंतराळात प्रवासादरम्यान आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 1986 आणि 2003 मध्ये नासाच्या स्पेस शटल अपघातात 14 लोकांना जीव गमवावा लागला होता. 1971 मध्येही सोयुझ 11 मोहिमेदरम्यान तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता.
4 / 8
याशिवाय, 1967 मध्ये अपोलो 1 लाँच पॅडला लागलेल्या आगीत तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, 2025 मध्ये परत एकदा चंद्रावर मानव आणि पुढच्या दशकात मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची नासाची योजना आहे.
5 / 8
एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू पृथ्वीच्या कक्षेत झाला, तर इतर क्रू काही तासांत त्याच्या मृतदेहाला कॅप्सूलद्वारे पृथ्वीवर परत पाठवू शकतात. हे चंद्रावर घडले, तरीही क्रू काही दिवसात मृतदेहासह पृथ्वीवर परत येऊ शकतात.
6 / 8
अशा परिस्थितींसाठी नासाकडे आधीच काही प्रोटोकॉल तयार आहेत. एखाद्याचा अंतराळात मृत्यू झाला तर त्याच्या मृतदेहाला सुरक्षित पृथ्वीवर पाठवण्याऐवजी उर्वरित क्रू पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्याला नासाचे प्राधान्य असते.
7 / 8
मंगळाच्या 300 मिलियन मैलांच्या प्रवासादरम्यान एखाद्या अंतराळवीराचा मृत्यू झाला तर गोष्टी वेगळ्या असतील. त्या परिस्थितीत क्रू कदाचित मागे फिरू शकणार नाही. तेव्हा क्रू मृत शरीराला वेगळ्या चेंबरमध्ये किंवा विशेष बॉडी बॅगमध्ये संरक्षित करेल.
8 / 8
अंतराळयानातील स्थिर तापमान शरीराचे संरक्षण करण्यास मदत करेल. परंतु हे सर्व तेव्हाच लागू होईल जेव्हा एखाद्या व्यक्तीचा स्पेस स्टेशन किंवा स्पेसक्राफ्टमध्ये मृत्यू झाला. जर एखाद्या व्यक्तीने स्पेससूटच्या संरक्षणाशिवाय अंतराळात पाऊल ठेवले तर ताबडतोब मृत्यू होईल.
टॅग्स :NASAनासाisroइस्रोJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय