शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'हा' आहे जगातील सगळ्यात महाग कीटक, किंमत इतकी की घेऊ शकाल एक लक्झरी कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 16:29 IST

1 / 7
जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्या किंमती ऐकून डोकं चक्रावून जातं. पण एखाद्या बारीक कीटकालाही लाखो रूपये किंमत मिळू शकते. याचा तुम्ही विचारही केली नसेल. या कीटकाची किंमत इतकी जास्त आहे की, तेवढ्या पैशात तुम्ही एखादी लक्झरी कारही खरेदी करू शकता. चला जाणून घेऊ या कीटकाला इतकी किंमत का मिळते.
2 / 7
जगातील सगळ्यात महाग कीटकाचं नावा स्टॅग बीटल आहे. हा कीटक कचऱ्यात राहतो आणि याची किंमत बीएमडब्ल्यू आणि ऑडी किंवा त्यापेक्षाही जास्त आहे.
3 / 7
स्टॅग बीटलला खरेदी करणारे लोक यासाठी ५० लाखांपासून ते १.५ कोटी रूपयांपर्यंत किंमत देऊ शकतात. या कीटकापासून अनेक महागडी औषधं तयार केली जातात. ज्यामुळे याची किंमत इतकी जास्त असते. यामुळेच या किटकाची प्रजाती लुप्त होण्याचा धोका वाढत आहे.
4 / 7
स्टॅग बीटल फारच दुर्मीळ कीटक आहे. हे कीटक गरम आणि ओलावा असलेल्या जागांवर राहतात. तसेच झाडांच्या सडलेल्या लाकडांमध्येही हे कीटक राहतात.
5 / 7
स्टॅग बीटलचा जीवनकाळ सरासरी ३ ते ७ वर्षाचा असतो. नर स्टॅक बीटलची लांबी ३५-७५ मिमी असते तर मादा स्टॅग बीटलची ३० ते ५० मिमी लांबी असते. तसेच त्यांचं वजन २ ते ६ ग्रॅम असतं.
6 / 7
नग स्टॅग बीटल आपल्या मोठ्या जबड्यांसाठी ओळखले जातात. जे हरणाच्या शिंगासारखे दिसतात. हे जबडे प्रजनन काळात मादांसोबत संभोग करण्याची संधीसाठी एकमेकांसोबत लढण्यासाठी वापरले जातात.
7 / 7
स्टॅग बीटलचा वापर औषधं तयार करण्यासाठी केला जातो आणि याला लकी चार्मही मनलं जातं. तसेच बागेत स्टॅग बीटल राहिल्याने अनेक फायदे होत असल्याचंही म्हटलं जातं.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल