Story of mystery man from taured mysterious country api
66 वर्षांपासून रहस्य बनून आहे 'काल्पनिक' देशातून आलेली 'ही' व्यक्ती, अचानक झाली होती गायब! By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 2:24 PM1 / 10कधी कधी जगात अशा घटना घडतात की, त्यावर विश्वासही ठेवणं अवघड जातं. आजपासून 66 वर्षांआधीही एक आश्चर्यकारक घटना समोर आली होती. ही घटना जपानच्या एअरपोर्टवर घडली होती. आजही या घटनेचं रहस्य उलगडलं गेलेलं नाही. इथे एक अशी आली होती जी सांगत होती ती एका अशा देशातून आली जो देश पृथ्वीवर कुठेच नाही. इतकेच नाही तर तो एका रूममधून अचानक गायबही झाला होता. (Image Credit : Social Media)2 / 10ही घटना आहे जुलै 1954 मधील दुपारी वाजताची. एक युरोपियन विमान टोकियोच्या हेनेडा विमानतळावर लॅंड झालं. विमानातील सगळेच प्रवासी बाहेर आलेत आणि चेकआउट काउंटरकडे गेले. अधिकारी सर्वांचे पासपोर्ट चेक करत होते. दरम्यान त्यांना एक असा पासपोर्ट दिसला जो बघून ते हैराण झाले. (Image Credit : Pixabay) 3 / 10या प्रवाशाच्या पासपोर्टवर 'टॉरेड' नावाच्या देशाचं नाव लिहिलं होतं. तिथे असलेल्या अधिकाऱ्याने अशा देशाचं नाव याआधी कधी ऐकलं नव्हतं. त्यांना प्रवाशी संशयित वाटला. त्यामुळे त्या प्रवाशाला एका वेगळ्या रूममध्ये नेण्यात आलं. अधिकाऱ्यांनी त्याला सर्वातआधी जपानमध्ये येण्याचं कारण विचारलं. यावर त्याने सांगितले की, तो एक व्यापारी आहे आणि व्यापारासंबंधी कामासाठी इथे आलाय.4 / 10सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशाच्या पासपोर्टची तपासणी केली. ज्यावर 'टॉरेड' लिहिलं होतं. त्यांनाही प्रश्न पडला की, खरंच असा देश आहे. त्या व्यक्तीने हेही सांगितले की, या पासपोर्टवर त्याने वेगवेगळ्या देशांचा प्रवास केलाय. (Image Credit : Pixabay)5 / 10अधिकाऱ्यांना हे ऐकून फारच आश्चर्य वाटलं. कारण त्याच्या पासपोर्टवर वेगवेगळ्या देशांचे शिक्के होते आणि ते खरे होते. पण तरिही हे अधिकारी हे मानायला तयार नव्हते की, ज्या देशातून हा प्रवासी आलाय, तसा देश प्रत्यक्षात पृथ्वीवर आहे. (Image Credit : Pixabay)6 / 10नंतर अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला जगाचा नकाशा दाखवला आणि टॉरेड देश दाखवण्यास सांगितले. यावर त्या प्रवाशाने 'अंडोरा'नावाच्या देशावर बोट ठेवलं आणि सांगितलं हा त्याचा देश आहे. पण नकाशावर टॉरेडऐवजी अंडोरा का लिहिलंय हे बघून ती व्यक्तीही हैराण झाली. 7 / 10आता अधिकारी आणखीनच प्रश्नात पडले. अखेर ती व्यक्ती एका 'काल्पनिक' देशाचं नाव सांगते आहे? पण त्याचा पासपोर्ट आणि व्हिजा आणि इतर कागदपत्रे पाहून तो खरं बोलत असल्याचं वाटत होतं. (Image Credit : Social Media)8 / 10आता तो प्रवासी खरं बोलतोय की खोटं हे जाणून घेण्यासाठी तो ज्या कंपनीकडे जाणार होता त्यांना विचारण्यात आलं. कंपनी आणि तो ज्या हॉटेलमध्ये थांबणार होता तिथे फोन केला तर त्यांनी या प्रवाशाला ओळखण्यास नकार दिला.9 / 10आता अधिकाऱ्यांना ही व्यक्ती गुन्हेगार असल्याचा संशय येऊ लागला होता. त्यांनी त्याचं सगळं सामान ताब्यात घेतलं आणि त्याला एका हॉटेलच्या रूममध्ये बंद केलं. पण सकाळी रूमचा दरवाजा उघडला तेव्हा तो तिथे नव्हता. बाहेर पोलीस असूनही तो कसा पळाला हे काही समजलं नाही. (प्रातिनिधीत छायाचित्र) (Image Credit : Pixabay)10 / 10पोलिसांनी धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांनी त्या व्यक्तीचे ताब्यात घेतलेलं पासपोर्ट, व्हिसा आणि इतर कागदपत्रेही गायब झाले होते. आता कुणालाही काही समजायला मार्ग नव्हता की, नेमकं काय घडलं. नंतर या घटनेबाबत अनेक कथा प्रचलित झाल्या. इतकेच काय तर य घटनेवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यातील एक म्हणजे 'डायरेक्टरी ऑफ पॉसिबिलिटीज'. आणखी वाचा Subscribe to Notifications