Story of a weird king name caligula in Rome
रोमचा एक असा सनकी राजा, ज्याने मित्रांसमोर पत्नीला निर्वस्त्र करून फिरवलं होतं, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 11:59 AM1 / 7आतापर्यंत आपण इतिहासातील अनेक राज्यांच्या कथा ऐकल्या-वाचल्या आहेत. यातील काही राजांच्या कथा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरतात. तर राजांचे किस्से ऐकल्यावर थरकाप उडतो. इतिहासातील अनेक असे राजा आहेत जे त्यांच्या कठोर वागण्यासाठी प्रसिद्ध आहेत. याच राजांपैकी एक होता रोमचा तिसरा सम्राट गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकस. रोमच्या सम्राटाच्या प्रयोगांचं जेवढं कौतुक होतं, तेवढीच त्याच्या सनकी स्वभावावर टिकाही होते होती.2 / 7बकरीचं नाव ऐकताच देत होता फाशी - कालिगुला दिसायला उंच आणि बारीक होता. तसेच त्याचे डोळे आतल्या बाजूला जास्त होते. शारीरिक दृष्टीने मजबूत नसल्याने अनेक लोक त्याची खिल्लीही उडवत होते. अनेकदा लोक त्याच्या डोळ्यांमुळे त्याची तुलना बकरीसोबत करत होते. त्यामुळे त्याच्यासमोर कुणीही बकरीचा उल्लेख केला तर सम्राट त्याला लगेच फाशीची शिक्षा सुनावत होता.3 / 7लांब केस असलेल्या लोकांना मिळाली शिक्षा - जर्मेनिकसला लांब केसांचा खूप राग येत होता. त्यामुळे त्याच्या साम्राज्यात कुणी लांब केसांचं दिसलं तर त्या व्यक्तीला लगेच टक्कल करण्याचा आदेश दिला जात होता.4 / 7घोड्याला बनवलं होतं मंत्री - रोमच्या या सम्राटाला घोडे खूप आवडत होते. तो त्याचा खास घोडा इनसिटॅटसच्या फार जवळ होता. इतकंच नाही तर असं सांगितलं जातं की, इनसिटॅटससाठी त्याने एक फार सुंदर घर तयार केलं होतं. घोड्याप्रति त्याचं प्रेम नंतर खूप वाढलं. काही लोक मानतात की, त्याने सनकीपणात एका घोड्याला राज्याचा मंत्री बनवलं होतं.5 / 7टबमध्ये सोन्याचे दागिने टाकून आंघोळ करत होता - कालिगुला यांच सोन्यावर खूप प्रेम होतं. इतकं की, तो जेव्हा आंघोळ करत होता तेव्हा टबमधील पाण्यात सोन्याचे दागिने टाकायचा आणि मग आंघोळ करत होता. त्यासोबतच असंही म्हटलं जातं की, तो मोती वितळवून ते पित होता.6 / 7मित्रांसमोर पत्नीला केलं नग्न - सम्राटाने चार लग्न केली होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने एका महिलेला तिच्या लग्नाच्या दिवशीच उचलून आणलं होतं. त्याने तिच्यासोबत लग्न केलं. त्याची तिसरी पत्नी आधीच दुसऱ्या व्यक्तीची पत्नी होती. त्याची चौथी पत्नी मिलोनिया फार बुद्धीमान आणि सुंदर होती. बस हेच सिद्ध करण्यासाठी कालिगुलाने तिला आपल्या मित्रांसमोर निर्वस्त्र करून फिरवलं होतं.7 / 7यासोबतच असं सांगितलं जातं की, गायस ज्यूलिअस सीझर जर्मेनिकसचे त्याच्या बहिणीसोबत शारीरिक संबंध होते. इतकंच नाही तर त्याने एका ज्योतिषाची भविष्यवाणी चुकीची सिद्ध करण्यासाठी एक पूल बनवला होता. ज्यामुळे रोममध्ये दुष्काळ पडला होता. या सम्राटावर अनेक डॉक्युमेंट्री आणि सिनेमे बनले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications