शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताचा असा गुप्तहेर जो पाकिस्तानी सेनेत होता मेजर, त्याची कहाणी वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:32 AM

1 / 12
सध्या गुप्तहेर, जासूस असे शब्द देशात फारच ऐकायला मिळत आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदर ही पाकिस्तानाही गुप्तहेर असल्याचं संशय व्यक्त केला जात आहे. अशात विस्मृतीत गेलेल्या काही भारतीय गुप्तहेरांची म्हणजे हिरोंचीही चर्चा होत आहे. आज अशाच एका भारतीय गुप्तहेराची कहाणी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याचं नाव होतं रवींद्र कौशिक. त्याला ब्लॅक टायगर म्हणूनही ओळखलं जात होतं.
2 / 12
रवींद्र कौशिक याला पाकिस्तानने 1983 मध्ये पकडलं होतं. त्याला खूप टॉर्चर करण्यात आलं. सगळ्या देशांप्रमाणे भारतीय गुप्तचर संघटना RAW दुश्मन देशांमध्ये आपले गुप्तहेर पाठवते. भारतातही आयएसआयचे कितीतरी गुप्तहेर फिरत असतील. यांना स्लीपर सेलही म्हटलं जातं. या गुप्तहेरांना पूर्ण ट्रेनिंग देऊन पाठवलेलं असतं.
3 / 12
रवींद्र कौशिकमुळे लाखो सैनिकांचा जीव वाचला होता. त्याला रॉ कडून एकापाठी एक मिशन देण्यात आले होते. जे तो पूर्ण करत होता. कौशिक हा मुळचा राजस्थानच्या गंगानगरचा राहणारा होता. त्याचा जन्म 11 एप्रील 1952 मध्ये झाला होता. वडील वायुसेनेत होते. त्याला थिएटरची आवड होती. त्याने बी.कॉम केलं होतं. तो दिसायला इतका हॅंडसम होता की, त्याची तुला अभिनेते विनोद खन्नासोबत केली जायची.
4 / 12
लखनैमध्ये एक नॅशनल लेव्हल ड्रामेटिक मीट झाली. यावेळीच तो रॉ च्या कॉन्टॅक्टमध्ये आला. तेव्हा त्याला अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये बोलवून रॉ बाबत सांगितलं. त्यानंतर त्याला दोन वर्ष ट्रेनिंग देण्यात आलं. त्याला मुस्लिम रितीरिवाज, उर्दू, अरबी शिकवण्यात आली. पंजाबी भाषा त्याला येत होती. कारण त्याचं गाव राजस्थान-पंजाबच्या सीमेवरच होतं. तो केवळ 23 वर्षांचा होता. 1975 ते 1977 दरम्यान त्याला ट्रेनिंग देण्यात आलं. तो अभिनय चांगला करायचा. त्यामुळे त्याला जास्त काळासाठी पाठवण्याचं ठरलं होतं. त्याला आधी टेस्ट म्हणून सहा ते सात देशात पाठवण्यात आलं होतं.
5 / 12
रवींद्र कौशिकने घरी तो दुबईला नोकरीसाठी जात असल्याचं सांगत पाकिस्तानला गेला होता. त्याला नवीन नाव नबी अहमद शकीर मिळालं. तो कराचीमध्ये पोहोचला. साल होतं 1978. आता नबी अहमद तेथील लोकांमध्ये मिसळत होता. त्याने कराची यूनिवर्सिटीमध्ये लॉ साठी अॅडमिशन घेतलं. त्यानंतर सेनेत भरतीबाबत पेपरमध्ये जाहिरात वाचली. मग काय तो सेनेत भरती झाला. तो इतका हुशार होता की, त्याला मेजर पद देण्यात आलं. 1979 ते 1983 पर्यंत तो सेनेत सेवेत होता.
6 / 12
यादरम्यान तो सेनेतील एका अधिकाऱ्याची मुलगी अमानतच्या प्रेमात पडला. दोघांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला. यामुळे पाकिस्तानी लोकांचा त्याच्यावर आणखी विश्वास बसला. तो भारताला मोठमोठी माहिती देत होता. या माहितीच्या माध्यमातून त्याने लाखो भारतीय जवानांचा जीव वाचवला होता. रवींद्रला चार भाऊ-बहीण होते. पण कुणाला तो काय करतो खबर नव्हती. एकदा तो लहान भावाच्या लग्नासाठी दुबईहून भारतात आला होता.
7 / 12
यावेळी जेव्हा वडिलांनी त्याला लग्न करण्यास सांगितलं तर तो म्हणाला की, त्याने लग्न केलं. पण त्याने तो काय करतो हे कुणालाही सांगितलं नाही. पण नंतर त्याने परिवाराला एक पत्र लिहिलं होतं, तेव्हा त्यांना समजलं. त्याने पुन्हा पाकिस्तानात जाऊन आपलं काम सुरू केलं. तो कुटुंबियांना शेवटचा 1981 मध्ये भेटला होता. त्यानंतर दोन वर्षांनी तो पकडला गेला होता.
8 / 12
1983 मध्ये इनायत मसीह नावाच्या एका दुसऱ्या एजंटला पाठवण्यात आलं होतं. त्याला कराचीमध्ये रवींद्रला काही कागदपत्रे द्यायची होती. त्याला पाकिस्तानी सेनेने पकडलं. त्याला खूप टॉर्चर करण्यात आलं आणि त्याने सगळं काही सांगितलं. त्याने रवींद्रबाबतही सांगितलं.
9 / 12
आता पाकिस्तानी सेनेने प्लान केला आणि इनायतला जे काम करण्यासाठी आला होता ते करण्यास सांगितलं. कराचीच्या जिन्ना गार्डनमध्ये तो रवींद्रला भेटला. तिथेच पाकिस्तानी सेनेचे जवान लपले होते. मग काय पुढील 18 वर्ष रवींद्रसाठी फार अवघड गेले.
10 / 12
पकडला गेल्यावर त्याला खूप टॉर्चर करण्यात आलं. पण त्याने काहीच सांगितलं नाही. 1985 साली त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. जर इनायत मसीहने आपलं तोंड उघडलं नसतं तर ब्लॅक टायगर आपली कामे पूर्ण करून भारतात आला असता.
11 / 12
नंतर याबाबत भारत सरकारला समजलं. रविदने उर्दूमध्ये काही लेटर वडिलांसाठी लिहिले होते. त्यात त्याने सांगितलं होतं की, तो पाकिस्तानात आहे आणि पकडला गेला आहे. तो रॉ चा गुप्तहेर होता. कौशिकच्या वडिलांना धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला. नंतर परिवारातील इतर लोकांच्या हाती ते लेटर लागलं. परिवाराने भारत सरकारला संपर्क केला. पण काही मदत मिळाली नाही.
12 / 12
रवींद्र कौशिकला अनेक तुरूंगांमध्ये ठेवण्यात आलं. ज्यात सियालकोट, कोट लखपत आणि मियांवाली यांचा समावेश होता. त्याला नंतर टीबी आणि हृदयरोग झाला होता. नोव्हेंबर 2001 मध्ये मियांवाली तुरूंगात त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याला शेवटपर्यंत भारत सरकारने स्वीकारलं नाही. पत्नी तुरूंगात कधीच भेटायला गेली नाही.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके