Strange! 'This' hotel, made from sweet salt; You will also be amazed by the photos
अजब-गजब! चक्क मिठापासून तयार केलं 'हे' हॉटेल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 11:48 AM1 / 5खाऱ्या फ्लॅट्ससाठी बोलिव्हिया देशातील उयुनी प्रसिद्ध आहे. मीठाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा वापर करून हे हॉटेल बनविण्यात आलं आहे. ‘पलासियो दे साल’ असं या हॉटेलचं नावं आहे. हॉटेलच्या भिंती, जमिनीपासून ते छतापर्यंत सर्व काही मिठाने बनविण्यात आलंय. 2 / 5आकर्षक फर्निचर, शिल्पे आणि शोभेच्या वस्तूही मिठापासून बनविण्यात आल्या आहेत. मात्र याठिकाणी सक्त ताकीद देण्यात आली आहे की, मिठाच्या भिंती इतर वस्तू नखांनी उकरून काढण्याला व या भिंती किती खारट आहेत हे चाखून पाहू नयेत3 / 5सॉल्ट फ्लॅटस् च्या मधोमध यापूर्वीही एक हॉटेल मिठाने बनविण्यात आले होते. हे हॉटेल १९९३ साली बांधण्यात आले असून, सुरुवातीला हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले होते.4 / 5या हॉटेलमध्ये 12 रुम्स होत्या मात्र असुविधा आणि अस्वच्छतेमुळे 2002 साली हे हॉटेल बंद पडले. 5 / 5हॉटेल ‘पलासियो दे साल’ 2007 मध्ये उभारण्यात आले. उयुनी शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications