शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Strange Village: ऐकावं ते नवलंच! उंदरांच्या बिळात राहतात 'या' गावातील लोक, 700 वर्षांचा आहे गावाचा इतिहास...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2022 4:48 PM

1 / 8
Strange Village: उंदरांची बिळे आपण सर्वांनीच पाहिली असतील. उंदीर त्यांच्या बिळातून बाहेर पडतात, अन्न शोधतात आणि नंतर पटकन बिळात लपून बसतात.
2 / 8
एवढ्या छोट्या बिळात उंदीर कसे जगत असतील, असा विचार तुम्ही कधी केलाय का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण जगाच्या नकाशावर असे एक गाव आहे, जिथे माणसे चक्क 'उंदरांच्या बिळात' राहतात.
3 / 8
कांदोवन हे इराणमधील गाव आहे. या गावातील लोक शेकडो वर्षांपासून 'उंदरांच्या बिळात' राहतात. जगातील काही गावे त्यांच्या सौंदर्यासाठी आणि काही विलक्षण परंपरांसाठी ओळखली जातात.
4 / 8
परंतु इराणमधील कांदोवन हे गाव उंदरांच्या बिळासारख्या घरांसाठी ओळखले जाते. खरतर या गावातील लोक उंदरांच्या बिळात राहत नाहीत, पण इथले लोक आपले घर अगदी उंदरांच्या बिळाप्रमाणे बनवतात. इथले लोक असे का करतात ?
5 / 8
उन्हापासून आराम मिळावा म्हणून कांदोवन गावातील लोक आपली घरे उंदरांच्या बिळाप्रमाणे बनवतात. हे घर दिसायला विचित्र असले तरी राहायला खूप आरामदायी आहे.
6 / 8
हे गाव 700 वर्षे जुने आहे. या गावात राहणाऱ्या लोकांना ना हीटरची गरज आहे ना एसीची. उन्हाळ्यात ही घरं एसीसारखी थंड पडतात तर हिवाळ्यात गरम होतात.
7 / 8
येथे राहणारे लोक सांगतात की त्यांच्या पूर्वजांनी मंगोलांचे आक्रमण टाळण्यासाठी हे गाव वसवले होते. कांदोवन गावातील सुरुवातीचे रहिवासी मंगोलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी येथे आले. येथे तो मंगोलांपासून लपण्यासाठी ज्वालामुखीच्या खडकांमध्ये लपण्याचे ठिकाण शोधत असे.
8 / 8
एकप्रकारे ते इथे खदाण खोदून त्यात राहत असे. हळूहळू हेच त्यांचे कायमचे घर बनले. आता हे गाव आपल्या अनोख्या घरांसाठी जगभरात ओळखले जाऊ लागले आहे. आता इथे दरवर्षी हजारो पर्यटक ही घरे पाहायला येतात.
टॅग्स :IranइराणJara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय