strangest trees from around the world
अजब झाडांपासून साकारलं असं काही की विश्वासच बसणार नाही By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 5:45 PM1 / 9जगभरात अनेक रहस्यमय ठिकाणं आहेत. मात्र ठिकाणांप्रमाणेच काही अजब झाडं ही जगभरात पाहायला मिळतात. अशाच काही अजब झाडांविषयी जाणून घेऊया. 2 / 9अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका झाडामधून बोगदा तयार करण्यात आला होता. 227 फूट लांब असलेले हे झाड 1969 मध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे खाली कोसळले. मात्र आता अनेक प्राण्यांनी या जागी आसरा घेतला आहे. 3 / 9सनलँड बोआब हे झाडाची लांबी ही 72 फूट तर रुंदी 155 फूट आहे. दक्षिण अफ्रिकेतील मोडजाडजिसक्लूफ (Modjadjiskloof) मध्ये हे झाडं आहे. 1933 मध्ये या झाडाच्या आत एक बार सुरू करण्यात आला होता. त्यावेळी फक्त 15-20 माणसं आत बसू शकत होती. मात्र आता 60 लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.4 / 9उत्तर-पश्चिम अफ्रिकेच्या कॅनरी बेटावर ड्रॅगन्स ब्लड ट्री आहेत. एक ड्रॅगन मेल्यानंतर त्याचं झाड झालं असं या ठिकाणी मानलं जातं. या झाडाच्या खोडातून रक्ताच्या रंगासारखे एक विशिष्ट द्रव्य बाहेर पडते. त्यामुळेच या झाडाला ड्रॅगन्स ब्लड ट्री असं म्हटलं जातं. 5 / 9सिल्क कॉटन ट्री हे कंबोडियातील एक प्रसिद्ध प्राचीन मंदिरावर असलेलं झाड आहे. याच्या फांद्या वर्षानुवर्षे वाढत असल्याने आजुबाजूचा परिसर सुंदर दिसत आहे. 6 / 9ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट डर्बी शहरात एक मोठे बोआब ट्री नावाचे झाड आहे. मात्र या झाडामध्ये एक जेल तयार करण्यात आले असून कैदयांना ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 7 / 9पोलंडमधील ग्राइफिनो शहरात विचित्र आकाराची 400 झाडं आहेत. या झाडांकडे रहस्य म्हणून पाहिले जाते. 8 / 9बॉटल ट्री हे जगभरातील धोकादायक झाडांपैकी एक असून नामिबियामध्ये ही झाडं आहेत. बॉटलसारखी ही झाडं असल्याने त्यांना बॉटल ट्री असं म्हटलं जातं. 9 / 9इंद्रधनुषी यूकलिप्टस हे झाडं फिलिपीन्समध्ये आहे. या झाडाचे खोड हे रंगीबेरंगी आहे. कागद तयार करण्यासाठी या झाडाचा वापर केला जातो. आणखी वाचा Subscribe to Notifications