शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता! मनुष्यांचं रक्त का पितात डास? कारण समजल्यावर हैराण झाले वैज्ञानिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 4:54 PM

1 / 9
डास आपलं रक्त पितात हे सर्वांनाच माहीत आहे. पण डास आपलं रक्त का पितात हे तुम्हाला माहीत आहे का? डासांना रक्त पिण्याची ही सवय कशी लागली? महत्वाची म्हणजे वैज्ञानिकांनी आता या प्रश्नांचं उत्तर शोधलं आहे. उत्तर ऐकून तुम्ही नक्कीच हैराण होणार. कारण जगाच्या सुरूवातीला डासांना रक्त पिण्याची सवय नव्हती. हा बदल हळूहळू झाला.
2 / 9
डासांनी मनुष्यांचं आणि इतर प्राण्यांचं रक्त पिण्यास सुरूवात करण्याचं कारण म्हणजे ते कोरड्या प्रदेशात राहत होते. जेव्हाही वातावरण गरम होत असे आणि डासांना प्रजननसाठी पाणी मिळत नव्हतं, तेव्हा त्यांनी मनुष्यांचं आणि इतर प्राण्यांचं रक्त पिण्यास सुरूवात केली.
3 / 9
न्यू जर्सीच्या प्रिंसटन यूनिव्हर्सिचीच्या वैज्ञानिकांनी आफ्रिकेतील एडीस एजिप्टी डासांवर अभ्यास केला. हे तेच डास असतात ज्यांच्याामुळे झिका व्हायरस परसतो. यांच्यामुळेच डेंग्यू आणि पिवळा ताप येतो.
4 / 9
न्यू सायंटिस्टमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, आफ्रिकेच्या डासांमध्ये एडीस एजिप्टी डासांच्या अनेक प्रजाती आहेत. सर्वच प्रजातींचे डास रक्त पित नाहीत. ते इतर काही द्रव्य पिऊन आपलं पोट भरतात.
5 / 9
प्रिंसटन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिक नोआह रोज यांनी सांगितले की, कुणीही आतापर्यंत डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या खाण्या-पिण्याबाबत रिसर्च केला नाही. आम्ही आफ्रिकेतील सब-सहारन भागातील २७ ठिकाणांवरून एडीस एजिप्टी डासांची अंडी घेतली.
6 / 9
आम्ही या अंड्यांमधून डासांना बाहेर येऊ दिलं. नंतर त्यांना मनुष्य, अन्य जीव, डुकरांसारख्या प्राण्यांवर लॅबमध्ये बंद डब्यांमध्ये सोडलं. जेणेकरून ते रक्त पिण्याचं पॅटर्न समजू शकतील. एडीस एजिप्टी डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींच्या डासांचं खाणं-पिणं एकदम वेगळं निघालं.
7 / 9
नोआह यांनी सांगितले की, ही बाब पूर्णपणे चुकीची सिद्ध झाली की सर्व प्रकारचे डास रक्त पितात. झालं असं की, ज्या भागात दुष्काळ किंवा गरमी जास्त असते. पाणी कमी असतं. तिथे डासांना प्रजननासाठी ओलाव्याची किंवा थंडाव्याची गरज पडते. पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी डास मनुष्यांचं आणि इतर जीवांचं रक्त पिण्यास सुरूवात करतात.
8 / 9
डासांमध्ये हा बदल हजारो वर्षांआधी आला आहे. एडीस एजिप्टी डासांची खास बाब ही होती की, वाढत्या शहरांमुळे त्यांना पाण्याच्या समस्येशी तोंड द्यावं लागलं. तेव्हा त्यांना मनुष्यांच्या रक्ताची गरज पडू लागली.
9 / 9
पण जिथे मनुष्य पाणी जमा करून ठेवत होते, तिथे एनोफिलीस डासांना(मलेरिया पसरवणारे) काहीच समस्या होत नव्हती. ते त्यांचं प्रजनन कूलर, कुंड्या, घराचे कोपरे, गटार या ठिकाणांवर करतात. पण जशीही पाण्याची कमतरता होते ते लगेच मनुष्य आणि इतर जीवांचं रक्त पिऊ लागतात.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेResearchसंशोधन