शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मॅनेजरची नोकरी सोडून 'हा' तरुण करतोय शेळीपालन; महिन्याला कमवतो लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 1:30 PM

1 / 5
हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील अजय जसवाल हजारो बेरोजगार तरुणांसाठी प्रेरणादायक बनले आहेत. ब्रिटानिया कंपनीतील मॅनेजर पदाची नोकरी सोडून अजय यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरु केला. सध्या अजय जसवाल यांच्याकडे शेळी पालनाचे 12 फार्म आहेत.
2 / 5
त्यांच्याकडे 40 शेळी आणि 8 बकरे आहेत. बीटल बकरी जातीच्या शेळ्या त्यांच्याकडे आहेत. अजय जसवाल यांचे फार्म बघण्यासाठी अनेक जण लांबून येतात. मार्केटमध्ये एका बकऱ्याची किंमत 20-30 हजार रुपये आहे. तसेच अजय याने शेतामध्ये 20 झाडं लावली आहेत त्यातून बकऱ्यांना चारा दिला जातो.
3 / 5
अजय यांच्यासारखेच कोलका येथील रहिवासी यूसुफद्दीन यांची यशस्वी कहाणी अशीच आहे. बीपीएलमधून यूसुफद्दीन यांना ऑक्टोबर 2018 मध्ये सरकारने 60 टक्के अनुदानावर 10 शेळ्या आणि 1 बकरा दिला. 1 वर्षाच्या गुंतवणुकीनंतर आज त्यांच्याकडे 20 शेळ्या आहेत.
4 / 5
या 20 शेळ्यांपैकी 10 गर्भवती आहेत. यूसुफद्दीनला मनरेगातंर्गत शेळ्यांच्या शेडसाठी 35 हजार रुपये आर्थिक मदत मिळाली आहे.
5 / 5
येथील राज्य सरकारचे पशु संवर्धन मंत्री विरेंद्र कवर यांनी सांगितले की, या वर्षी शेळी पालनासाठी त्यांचे सरकार 20 कोटी रुपये खर्च करणार आहे. बकरीच्या दुधाला बाजारात चांगला भाव मिळतो असंही त्यांनी सांगितले.