शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता! समुद्रातील 600 वर्ष जुन असं मंदिर, ज्याची सुरक्षा आजही विषारी साप करतात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 3:50 PM

1 / 9
तशी तर भारतासहीत जगभरात मंदिरांची अजिबात कमतरता नाही. इंडोनेशियातही अनेक आकर्षक मंदिरे आहेत. त्यातील एक फारच खास मंदिर आहे. हे मंदिर समुद्रातील एका मोठ्या दगडावर आहे.
2 / 9
हा दगड हजारो वर्षांपासून समुद्री पाण्यातील लाव्हारसामुळे तयार झाला आहे. हे अनोखं मंदिर तयार होण्याची कहाणी सुद्धा फार रोमांचक आहे. ही कहाणी वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. (Image Credit : pinterest.com)
3 / 9
या मंदिराला तनाह लोत मंदिर असं नाव आहे. जे इंडोनेशियातील बालीमध्ये आहे. स्थानिक भाषेत 'तनाह लोत' चा अर्थ समुद्र भूमी असा होतो.
4 / 9
हे मंदिर बालीमधील समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेल्या 7 मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरांची खासियत म्हणजे या मंदिरातून समोरचं स्पष्ट दिसतं.
5 / 9
नंतर हे मंदिर वाचवण्यासाठी जपानच्या सरकारने इंडोनेशियातील सरकारची मदत केली होती. तेव्हा या दगडाला जवळपास एक तृतीयांश कृत्रिम दगडाने झाकण्यात आलं आणि नवं रूप देण्यात आलं.
6 / 9
असे म्हणतात की, तनाह लोत मंदिराची निर्मिती 15 व्या शतकात निरर्थ नावाच्या एका पुजाऱ्याने केली होती. समुद्र किनाऱ्यावर चालत असताना तो या ठिकाणी पोहोचला होता. येथील सुंदरता त्याला आवडली.
7 / 9
त्यानंतर तो रात्रभर तिथेच थांबला. त्यानेच आजूबाजूच्या मच्छिमारांना या ठिकाणी समुद्रे देवताची मंदिर बांधण्याचा आग्रह केला. या मंदिरात पुजारी निरर्थची देखील पूजा केली जाते.
8 / 9
असे मानले जाते की, वाईट आत्मा आणि वाईट लोकांपासून या मंदिराची सुरक्षा या मंदिराखाली राहणारे विषारी साप करतात.
9 / 9
अशीही मान्यता आहे की, पुजारी निरर्थने त्याच्या शक्तीने एका विशाल समुद्री सापाची निर्मिती केली होत. हा सापही आजही तिथे असल्याचा समज आहे.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेIndonesiaइंडोनेशिया