शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अरे बाप रे बाप! Tanzania खतरनाक सरोवर; यातील पाण्याला स्पर्श केल्यास कुणीही बनतं दगड, जाणून घ्या रहस्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 10:51 AM

1 / 10
सरोवर हे आपल्या सुंदरतेसाठी आणि शांततेसाठी अनेकांना आवडतात. पण जगात असेही काही रहस्यमय सरोवर आहेत ज्यांच्या नावानेच लोक घाबरतात. उत्तर तंजानियातील नेट्रॉन सरोवर या लिस्टमध्ये सर्वात वर आहे. असे म्हणतात की, या सरोवरातील पाण्याला जो कुणी स्पर्श करेल तो दगड बनतो.
2 / 10
याचा पुरावा सरोवराच्या आजूबाजूला सापडलेले प्राणी आणि पक्ष्यांच्या दगडांच्या मूर्ती. तुम्हाला वाचून धक्का बसेल की, या मूर्तींचे पंखही दगडांचे झाले आहेत. पण खरंच या सरोवरातील पाण्यात काही शक्ती आहे का जी सगळ्यांना दगड बनवते?
3 / 10
तंजानियन सरोवर नेट्रॉनच्या चारही बाजूने शेकडो पक्ष्यांच्या मूर्ती पडल्या आहेत. ज्यांचे पंखही दगडांचे आहेत. वैज्ञानिकांनी यांच रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या हाती काही खास लागलं नाही. पण खरंच या सरोवरातील पाणी कुणालाही दगड बनवतं का? हे कसं शक्य आहे? चला जाणून घेऊ याचं रहस्य....
4 / 10
तंजानियाच्या अरूषा परिसरात असलेल्या या सरोवराच्या आजूबाजूला दूरदूरपर्यंत मानवी वस्ती नाही. या सरोवराच्या आजूबाजूला प्राणी आणि पक्ष्यांच्या दगडांच्या मूर्ती पडल्या आहेत, ज्यांना बघून सरोवर जादुई असल्याचं खरं वाटू लागतं. पण यामागे काही जादू नाही तर रासायनिक पाणी आहे.
5 / 10
नेट्रॉन एक अल्केलाइन सरोवर आहे. ज्यातील पाण्यात सोडिअम कार्बोनेटचं प्रमाण अधिक आहे. पाण्यात अल्केलाइनचं प्रमाण अमोनिया इतकी आहे. हे तसंच आहे जसं इजिप्तमध्ये लोक ममीला सुरक्षित ठेवण्यासाठी केमिकल कोटिंग करत होते. त्यामुळेच पक्ष्यांचे मृत शरीर वर्षानुवर्षे सुरक्षित आहेत.
6 / 10
या रहस्यमय सरोवरावरून पडदा उठवण्यासाठी पर्यावरणवादी आणि वाइल्डलाईन फोटोग्राफर Nick Brandt या सरोवराजवळ गेले. त्यांनी तेथील काही फोटो काढले. यावर त्यांनी एक पुस्तकही लिहिलं. 'अक्रॉस द रेवेज्ड लॅंड' नावाच्या या पुस्तकात अशा गोष्टी आहेत ज्यांनी सरोवराच्या रहस्यावरून पडदा उठतो. पण फोटोग्राफर हे रहस्य जाणून घेऊ शकले नाहीत की, अखेर सरोवराच्या आजूबाजूला इतक्या पक्ष्यांचा मृत्यू कसा झाला.
7 / 10
दरम्यान जगात नेट्रॉन असा एकुलता एक सरोवर नाही. अनेक सरोवरांचे रहस्य आजही उलगडले गेलेले नाही. रंवाडातील किवू सरोवरही असंच आहे. या सरोवराला आफ्रिकन ग्रेट लेक्सच्या यादीत ठेवण्यात आलं आहे. या सरोवरातील पाण्यात कार्बन डायऑक्साइड आणि मीथेन मोठ्या प्रमाणात आहे.
8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके