शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Teachers’ day: गृहपाठ अपूर्ण असताना शिक्षकांना दिली जाणारी पाच कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 3:17 PM

1 / 5
अभ्यास केला; पण वही विसरलो: गृहपाठ केला नसेल, तर हे कारण हमखास दिलं जायचं. खरंतर शिक्षकांनादेखील माहित असायचं की विद्यार्थ्यानं अभ्यास केलेला नाही. मात्र तरीही हे कारण सांगून वेळ मारुन नेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असायचा.
2 / 5
मित्रानं वही घेतली: मी अभ्यास केला होता. पण शेजारी राहणाऱ्या मुलानं वही घेतली. तोदेखील माझ्याच इयत्तेत आहे. मात्र तो आपल्या शाळेत नाही, असंही कारण विद्यार्थ्यांकडून दिलं जातं.
3 / 5
वही बदली झाली: मी अभ्यास केला होता. मात्र बॅग भरताना भाऊ/बहिणीसोबत वह्यांची अदलाबदल झाली. शाळेत येऊन पाहिलं, तेव्हा ही गोष्ट लक्षात आली.
4 / 5
वही भिजली: गृहपाठ केला होता. पण वही भिजल्यानं आणता आली नाही. वही सुकायला ठेवली आहे. उद्या नक्की आणतो.
5 / 5
मला बरं नव्हतं: मला ताप आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला. तब्येत बरी वाटली म्हणून आज शाळेत आलो. बरं वाटत नव्हतं. त्यामुळे आराम केला, म्हणून अभ्यास राहिला.
टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनTeacherशिक्षकStudentविद्यार्थी