शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तीन वर्ष लिव इनमध्ये राहिला, मुलं झाली; आता एकाच मंडपात दोन महिलांसोबत केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 9:24 AM

1 / 7
लग्न समारंभाच्या अनेक मजेदार घटना आणि त्यांचे व्हिडीओ नेहमीच समोर येत असतात. काही व्हिडीओ तर सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात. तेलंगणामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका आदिवासी समाजातील व्यक्तीने दोन महिलांसोबत लग्न केलं.
2 / 7
ही व्यक्ती गेल्या तीन वर्षापासून या महिलांसोबत लिव-इन-रिलेशनशिपमध्ये होता. हा लग्न सोहळा बुधवारी भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील एका गावात झाला आणि यात मोठ्या संख्येने पाहुणे आले होते. खास बाब म्हणजे दोन्ही महिलांकडून या व्यक्तीला एक-एक अपत्यही आहे.
3 / 7
गुरूवारी सकाळी लग्न होणार होतं. पण लग्नाची बातमी सगळीकडे पसरली तेव्हा तिन्ही परिवारात वादळ आलं. त्यामुळे काहीही अडचण येऊ नये म्हणून लग्नाची वेळ बदलण्यात आली.
4 / 7
रिपोर्टनुसार, येराबोरू गावातील एम सत्तीबाबू दोन वेगवेगळ्या गावातील स्वप्ना आणि सुनीताच्या प्रेमात पडला होता. सुनीताने एका मुलाला जन्म दिला तर स्वप्नाने एका मुलीला. लग्नावरून दोन महिलांच्या परिवारात मारामारीही झाली होती.
5 / 7
पण सत्तीबाबूने त्यांना शांत केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, दोन्ही महिलांसोबत तो लग्न करेल. त्याने दोन नवरींची नावे असणारं लग्नाचं कार्डही छापलं होतं.
6 / 7
ही लग्न पत्रिका व्हायरल झाली आणि काही मीडियाचे लोक गावात पोहोचले. त्यामुळे तिन्ही परिवारांना भीती होती की, अधिकारी हे लग्न रोखू शकतात. त्यामुळे त्यांनी ठरलेल्या वेळेच्या आधीच लग्न लावण्याचा निर्णय घेतला.
7 / 7
असं म्हटलं जातं की, काही आदिवासी समाजांमध्ये एकाचवेळी दोन महिलांसोबत लग्न करणं मान्य आहे. 2021 मध्ये तेलंगणाच्या अदिलाबाद जिल्ह्यातही एका व्यक्तीने आपल्या मावशीच्या दोन मुलींसोबत लग्न केलं होतं.
टॅग्स :Telanganaतेलंगणाmarriageलग्नJara hatkeजरा हटके