शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' रस्त्यावरून चालताना अचानक गायब होते कार; जाणून घ्या, रहस्यमय हायवेची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 9:47 AM

1 / 7
जर आम्ही तुम्हाला अशा हायवेबद्दल सांगितले ज्यावर चालताना वाहने गायब होतात, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका हायवेबद्दल सांगणार आहोत, ज्यावर लोक अजूनही जायला घाबरतात. हा मार्ग म्हणजे अमेरिकेतील हायवे क्रमांक 666 (HighWay 666)
2 / 7
या रस्त्याला मोठा इतिहास आहे. लोक या रस्त्याला 'डेव्हिल्स रोड' किंवा 'द डेव्हिल्स हायवे' म्हणतात. मात्र, मे २०१३ मध्ये त्याचं नाव बदलून ४९१ करण्यात आले. या महामार्गाचे नाव का बदलले? हा (द डेव्हिल्स हायवे) इतका रहस्यमय का आहे? याबाबत जाणून घेऊया
3 / 7
हा महामार्ग ३११ किमी लांब आहे. या हायवेला नंबर १९२६ मध्ये देण्यात आला होता. हा महामार्ग तयार झाल्यापासून या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. या महामार्गावरून चालताना अनेक वाहने बेपत्ता झाल्याचा लोकांचा दावा आहे. यातील अनेक वाहनांचा आजपर्यंत शोध लागलेला नाही
4 / 7
असं म्हणतात की, १९३० साली एके दिवशी या रस्त्यावरून जाणारी काळ्या रंगाची पियर्स-एरो रोडस्टर कार अचानक गायब झाली. याबाबत काहीही कळू शकले नाही. यानंतर डझनभर कार, ट्रक आणि मोटारसायकलींचा याच कारच्या दिसण्यानं अपघात झाला. त्यामुळे या महामार्गाच्या नावानेच लोक घाबरू लागले. लोक तिथे जाणे टाळायचे.
5 / 7
या महामार्गाबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातांसाठी लोक पियर्स एरो कारला शैतानी कार असल्याचं म्हणत आहेत. या महामार्गावर वाहने थांबविणाऱ्यांना राक्षसी शक्तींनी अनेकदा भीती घातल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
6 / 7
त्याच वेळी, काही लोक असेही म्हणतात की एकदा दोन मोटारसायकलस्वारांचे दोन्ही हात कुत्र्यांनी खाल्ले आणि त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा चेहरा ९० टक्के चावला. हायवेवर एक महिला चालताना दिसते. तिला कोणीतरी गाडीत लिफ्ट दिल्यावर ती वाटेत अचानक गायब होते असं या महामार्गाबाबत अनेकांचा दावा आहे.
7 / 7
हा महामार्ग न्यू मेक्सिको, कोलोरॅडो, उटाह आणि ऍरिझोना राज्यांना जोडतो. या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातानंतर यामागे याचा क्रमांक दुर्दैवी असल्याचं अनेकांनी सांगितले. त्यात बदल करण्याची मागणी लोकांनी केली. यानंतर महामार्गाचे नाव बदलण्यात आले. मात्र, महामार्गाचा क्रमांक बदलल्यानंतर येथील अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले.